प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उचलले हे पाऊल….

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अनेक प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षणाची धारा घराघरापर्यंत पोहचविणाऱ्या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

या आंदोलनात जिल्ह्यातील पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या शिक्षकांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे.

महाविद्यालय व विद्यापीठीय कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत उच्च व तंत्र शिक्षण व वित्त विभागाच्या उदासीनतेच्या भूमिकेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समिती यांनी

24 सप्टेंबर पासून लेखणी व अवजार बंदसह ठिय्या आंदोलन पुकारले आहे. तसेच या काम बंद आंदोलनामध्ये न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांना

आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याचे निवेदन दिले. मागण्या मान्य करत शासनाकडून अन्याय केला जात असल्याने हे आंदोलन कर्मचार्‍यांना करावे लागत आहे.

हे शासनाने लादलेले आंदोलन असणार आहे याची सर्व जबाबदारी शासनावर असणार आहे, असे आंदोलनकर्ते म्हणाले. यावेळी जिल्हा संघटनेचे सदस्य सुनील चव्हाण,

रुपेश शिंदे, तालुका अध्यक्ष बाबुराव शिंदे, उपाध्यक्ष गणेश साबळे, सचिव ठकाराम बुगे, सहसचिव रोहिणी दिघे तसेच नामदेव ठाणगे, सावकार काकडे व सर्व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved