अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे चार पाऊले दूर राहिलेला आहे.
दरम्यान हे सुरु असतानाच जिल्ह्यातील एका गावातून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे गाव काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात करोना रूग्णांचे प्रमाण कमी झालेले असताना नगर तालुक्यात अकोळनेर येथे अचानक ३८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. याशिवाय १२९ जणांचा अहवाल येणे बाकी आहे.
धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे कारण म्हणजे हे सर्व जण भजनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
नंतर काहींना अस्वस्थ वाटू लागल्याने आरोग्य यंत्रणेने ॲंटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. यात तब्बल ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या पार्श्वभूमीवर अकोळनेर गाव सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
गावात कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन माजी सरपंच अनिल मेहेत्रे यांनी केले आहे .
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved