अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे मात्र अद्यापही काहीसा कायम आहे. यातच राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यास शासनाने बंदी घातली आहे.
यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहूनच यंदाच्या वर्षी सर्व सणउत्सव साजरे करावे लागणार आहे. यातच लाखो करोडोंचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साई दरबार मधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दि. 14 नोव्हेंबर 2020 रोजी दिपावली लक्ष्मीपुजन उत्सव साजरा करण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे 17 मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.
त्यामुळे शनिवार दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येणारा दिपावली लक्ष्मीपुजन उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.
तसेच उत्सवाच्या रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात येणार्या लक्ष्मीपुजनाचे वेळी पूजेकरीता गांवकरी, साईभक्तांकडून पैसे अथवा नाणी पाकीटे स्विकारण्याकामी मंदिर परीसरात व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
तसेच सर्व गांवकरी व साईभक्तांनी लक्ष्मीपुजनाकरीता पाकीटे देतांना आणि घेतांना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करावे. तसेच संस्थानचे संरक्षण व पाकीटे स्विकारणारे कर्मचार्यांना सहकार्य करावे, असे आवाहन ही बगाटे यांनी केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved