Tourist Place In Nashik: पावसाळ्यात फिरायला जायचा प्लान आहे का? तर नाशिक जिल्ह्यातील ‘ही’ स्थळे देतील तुम्हाला स्वर्गसुख

Ajay Patil
Published:
igatpuri

Tourist Place In Nashik:- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हे हे निसर्गाच्या देणगीने परिपूर्ण भरलेले असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपल्याला निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळे व अनेक अशी ऐतिहासिक पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्रावर निसर्गाने खूप भरभरून अशी कृपा केली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाल तरी देखील तुम्हाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उत्तम अशी ठिकाणे सापडतील हे मात्र निश्चित. अशा परिस्थितीत पावसाळ्यामध्ये जर तुमची देखील कुठे फिरायला जायची इच्छा असेल व निसर्ग सौंदर्याची भुरळ तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा विचार करू शकतात.

या जिल्ह्यामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळे असून काही अध्यात्मिक ठिकाणी देखील आहेत. तुम्ही या पावसाळ्यात जर तुमचा वीकेंड प्लान असेल तर नाशिक जिल्हा हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

ही आहेत नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात महत्त्वाचे पर्यटन स्थळे

1- दूधसागर धबधबा हा धबधबा नाशिक शहरापासून जवळ असून गोदावरी नदी खडाळून व्हायला लागली की गंगापूर गावाजवळ सोमेश्वर मंदिरापासून काही अंतरावर हा धबधबा आहे. हा धबधबा दगडी कातळावरून नदीपात्रामध्ये कोसळतो व जेव्हा हा कोसळतो तेव्हा त्या ठिकाणच्या जलधारांचे दृश्य हे मनाला मोहून टाकणारे असते.

2- त्र्यंबकेश्वर नाशिक पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर हे स्थळ देखील पावसाळ्यात सहलीसाठी खूप उत्तम असे ठिकाण आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असलेले निसर्गसौंदर्य पाहून प्रत्येक व्यक्ती आकर्षित होतो. या ठिकाणी असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा व त्यांना चढलेला हिरवाईचा साज पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो.

या ठिकाणी बरसणाऱ्या पावसाच्या सरी व फेसाळुन वाहणारी धबधबे, अंगाला हवीहवीशी वाटणारी थंड वाऱ्याची झुळूक असे वातावरण तुम्हाला त्र्यंबकेश्वरला अनुभवायला मिळते. तसेच तुम्ही त्रंबकेश्वरला जात असताना अंजनेरी या गावाचा फेरफटका देखील मारावा.

त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणी मेटघर किल्ला तसेच ब्रह्मगिरी पर्वत इत्यादी निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थळे पाहण्यात देखील खूप मनाला शांतता लाभते. त्या ठिकाणी जव्हार या रस्त्याने जर थोडे तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला दुगारवाडी धबधबा देखील बघायला मिळतो.

3- इंद्रपुरी अर्थात इगतपुरी पावसाळ्यातील भटकंतीमध्ये इगतपुरी तालुक्याला भेट देणे म्हणजे प्रकारे स्वर्गाला भेट देण्यासारखेच आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मनसोक्त बरसणाऱ्या पावसाच्या धारा या जलधारांमध्ये चिंब भिजलेली इगतपुरी डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. तसेच तुम्ही इगतपुरी जेव्हा जाल तेव्हा घोटी येथे टोल नाका लागतो व त्या टोल नाक्याच्या पुढे काही मीटर गेल्यावर डावीकडे भावली धरणाकडे तुम्हाला जाता येते.

भावली धरणाच्या आसपास असलेल्या भात शेतीचे दृश्य तुम्हाला मोहून टाकते. हिरवाईने नटलेल्या आणि ढगांची शालू पांघरलेल्या डोंगररांगा तुमचे लक्ष वेधून घेतात. या ठिकाणी थंड वाऱ्याचे मंद झुळूक वातावरण मोहून टाकते.

जेव्हा तुम्ही भावली धरणाच्या परिसरामध्ये जाल तेव्हा तुम्हाला डाव्या हाताला गायवझरा हा धबधबा दिसतो व याचे सौंदर्य आणखीनच अनोखे आहे. हा धबधबा पाहून तुम्ही भंडारदर्‍याच्या दिशेने तुम्हाला जाता येते. हा धबधबा पाहून थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला सूपवझरा हा धबधबा देखील पाहायला मिळतो.

4- वणीचा सप्तशृंगी गड नाशिक शहराच्या उत्तरेस 65 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पूर्व पश्चिम पर्वत रांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे 4569 फुट उंचीवर डोंगराच्या पठारावर सप्तशृंगी गड हे ठिकाण वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येतेच परंतु त्यासोबत तिथे भक्तीने ओथंबून वाहणारे वातावरण देखील अनुभवता येते.

पावसाळ्यामध्ये या ठिकाणी डोंगर रांगांना बिलगलेली ढगे पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात. तसेच हिरवाईचा साज पांघरलेल्या डोंगररांगा या ठिकाणच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकतात. जेव्हा आपण सप्तशृंगी गडावर जातो तेव्हा डोंगरदऱ्यातून जाणारी वाट पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. या ठिकाणी गेल्यानंतर सर्व बाजूंनी पसरलेली हिरवळ,

डोंगरावरून वाहणारे लहान मोठे धबधबे मनाला आकर्षित करतात. तुम्हाला माहित असेलच की महाराष्ट्रातील सप्तशृंगी देवीचे मंदिर साडेतीन पिठांपैकी अर्धे पीठ मानले जाते. गडावर देवीचे मोठे भव्य मंदिर असून या ठिकाणी सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू प्रकाराचे आहे. या ठिकाणी जाण्यासाठी नाशिक वरून बसेस उपलब्ध आहेत. समुद्रसपाटीपासून काही फूट उंचीवर हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी माकडांची संख्या देखील मनाचे लक्ष वेधून घेते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe