Tourist Place In Nashik: नाशिकच्या ‘या’ महत्त्वाच्या स्थानांना भेट द्या आणि भन्नाट पद्धतीने करा नववर्षाचे स्वागत! वाचा ए टू झेड माहिती

Published on -

Tourist Place In Nashik:- पर्यटन म्हटले म्हणजे भारतामध्ये अशा अनेक ठिकाणी आहेत की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ती खूप महत्त्वपूर्ण आहेत. भारताला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपदा लाभले असल्यामुळे  भारतातील प्रत्येकच राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांची रेलचेल आपल्याला बघायला मिळते.

तीच बाब महाराष्ट्राला देखील लागू होते. महाराष्ट्रमध्ये देखील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन स्थळे असून प्रत्येक जिल्ह्याची वेगळी अशी ओळख आहे. काही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक पर्यटन स्थळे तर मोठ्या प्रमाणावर आहेतच परंतु काही जिल्ह्यांमध्ये धार्मिक पर्यटन स्थळे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत.

या अनुषंगाने जर तुम्हाला नवीन वर्षाच्या स्वागताची किंवा नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या चांगल्या मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी दर्शनाने करायचे असेल तर तुमच्यासाठी नासिक जिल्ह्यातील धार्मिक आणि प्रेक्षणीय या स्थळे खूप फायद्याचे ठरतील. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील काही धार्मिक पर्यटन स्थळांची माहिती घेऊ.

 नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची धार्मिक पर्यटन स्थळे

1- पांडवलेणी नाशिक शहरातील महामार्ग बस स्टॅन्ड पासून चार किमी अंतरावर नाशिक मध्ये पांडवलेणी असून ते एका मोठ्या टेकड्यावर आहेत. या ठिकाणी पाली भाषेतील शिलालेख आढळून येतो. पांडवलेणी बद्दल म्हटले जाते की या लेणी साधारणपणे दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. या ठिकाणी एकूण 24 लेणी आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही नाशिक येथील निमानी बस स्थानकावरून पाथर्डी बसने या ठिकाणी जाऊ शकतात.

Pandavleni Caves, Nashik - Timings, History, Best time to visit

2- तपोवन नाशिक येथील पंचवटी पासून दीड किमी अंतरावर हे ठिकाण आहे. तपोवनाचे महत्त्वाचे अध्यात्मिक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणाचा संबंध हा रामायणाशी असून जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण व सीता वनवासात होते तेव्हा ते या ठिकाणची फळे सेवन करत होते. महत्वाचे म्हणजे रावणाची बहीण शृपणखेचे नाक या ठिकाणी लक्ष्मनाने कापले होते. या परिसरामध्ये लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जनार्दन स्वामींचे मंदिर व रामपर्णकुटी देखील आहे. जेव्हा नाशिकला कुंभमेळा होतो तेव्हा या ठिकाणी साधूंचे वास्तव्य असते.

All religion temple Tapovan | Nashik District, Government of Maharashtra |  India

3- सीतागुंफा काळाराम मंदिरापासून अगदी जवळ सीतागुंफा असून जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते तेव्हा त्या दरम्यान सीता मैया या ठिकाणी राहत होते असे म्हटले जाते. यामध्ये पहिल्या मुख्य गुंफ्यामध्ये राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती असून दुसऱ्या लहान गुंफ्यात शिवलिंग आहे. याच ठिकाणहून रावनाने भिकारीच्या वेषेमध्ये सीतेचे हरण केले होते.

Sita Gufa, Nashik, Timings, Things to do - Total Safari

4- काळाराम मंदिर काळाराम मंदिर आहे नाशिक मधील एक प्रमुख धार्मिक स्थळ असून देशविदेशातून अनेक नागरिक या ठिकाणी रामाच्या दर्शनासाठी येतात. सरदार रंगराव ओढेकर यांनी 1782 मध्ये हे मंदिर बांधले व त्या अगोदर या ठिकाणी जुने लाकडी मंदिर होते. काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. प्रत्येक वर्षाला चैत्र महिन्यात या ठिकाणी रामनवमीचा उत्सव आयोजित केला जातो.

Kalaram Temple Nashik | The Kalaram temple is an old Hindu s… | Flickr

5- खंडोबाची टेकडी देवळाली छावणी परिसरामध्ये लहान टेकडीवर हे खंडोबाचे मंदिर असून भगवान शंकरांच्या अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर 500 वर्षे जुने आहे. या टेकडीला खंडोबाची टेकडी असे देखील म्हणतात. हे स्थळे प्रेक्षणीय स्थळ असून तुम्हाला जर या ठिकाणी जायचे असेल तर नाशिक मधील तपोवन बस डेपोतून देवळाली बस मधून तुम्ही खंडोबाच्या टेकडीवर जाऊ शकतात.

Khandobachi Tekadi, Deolali - Nashik Tourism

6- त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक पासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या अगदी पायथ्याशी त्र्यंबकेश्वर तालुका असून त्या ठिकाणी प्राचीन तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणहून गोदावरी नदीचा उगम होतो. अध्यात्मिक दृष्टिकोनातून या ठिकाणाला खूप महत्त्व आहे.

Trimbakeshwar / Tryambakeswar, Nashik - Timings, History, Pooja & Aarti  schedule,

7- श्री सप्तशृंगी गड नाशिक शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यामध्ये सप्तशृंगी देवीचे मंदिर असून सात शिखरांनी हे मंदिर वेढलेले आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ म्हणून हे स्थान ओळखले जाते. या ठिकाणी आठ फुटाची सप्तशृंगी देवीची मूर्ती पाषाणामध्ये कोरलेली असून या मूर्तीच्या दोन्ही बाजूस 9 असे एकूण 18 हात व त्यामध्ये विविध शस्त्र आहेत. सप्तशृंगी गडावर चैत्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. नाशिक मधून जर तुम्हाला सप्तशृंगी गडावर जायचे असेल तर तुम्ही नाशिक मधील दिंडोरी नाका येथून बसने जाऊ शकतात.

Saptashrungi - Wikipedia

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News