अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- पंढरपुरातील प्रसिद्ध कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त हभप रामदास महाराज जाधव यांचं कोरोनामुळे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे ,
त्यांच्यावर अकलूजमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. रामदास महाराज जाधव (कैकाडी) यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच प्राणज्योत मालवली.

रामदास महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. रामदास महाराज जाधव ( कैकाडी) हे मूळ अहमदनगर येथील होते. वारकरी संप्रदायात त्यांना मानाचं स्थान होतं.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. रामदास महाराज हे कैकाडी महाराजांचे पुतणे होतं. तेच कैकाडी मठाचं व्यवस्थापन पाहत होते.
विशेष म्हणजे रामदास महाराज मठाची जन्मकथा व तिचा उद्देश प्रभावीपणे सांगत, मठात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे होत असतात.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved