अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- हत्तीच्या पिल्लाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून डुलत फेरफटका मारत असताना अचानक हत्तीला समोर दोघेजण केळ खाताना दिसले.
त्यामुळे मोह न आवरल्याने हत्ती ने त्यांच्या हातातील केळ हिसकावून सोंडत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Going bananas over banana💕
Kids will be kids. Shared. pic.twitter.com/zYTWFMAgJp— Susanta Nanda IFS (@susantananda3) September 28, 2020
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोन तरुण केळी सोलून खाण्यासाठी तयार होते मात्र समोरून येणारा हत्ती त्यांच्या हातातील सोलेलं हे केळ हिसकावून गट्टम करतो पुढे जातो
आणि दुसऱ्या व्यक्तीच्या हातातील केळही स्वत:च खाऊन टाकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आपल्याच धुंदीत असणाऱ्या हत्तीला केळी पाहून मात्र मोठा आनंद झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हा हत्ती केळी खाण्यासाठी इतका भुकेलेला आहे की त्याने सालेही सोडले नाही. खाली पडलेला केळ्याचा तुकडाही वाया जाऊ न देता उचलून खाऊन निघून गेला हे दोन तरुण मात्र त्याच्याकडे पाहात राहिले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved