हरिनाम सप्ताहात करोनाबाधिताने वाढप्याचे काम केले आणि गावात झाले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  जामखेड तालुक्‍यातील सोनेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणावळीत करोनाबाधिताने वाढप्याचे काम केल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 139 व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली.

त्यातील 23 जण बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सप्ताहात आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी हजेरी लावली. त्यामुळे करोनाचा सामूहिक संसर्ग झाला असून, रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती कायम आहे.

धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधन असताना हा सप्ताह कोणाच्या परवानगीने व कोणी आयोजित केला, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

तालुक्‍यातील सोनेगाव येथे काही उत्साही कार्यकर्त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहात काही संशयित करोनाबाधितही सहभागी झाले होते. त्यातील चार जण तीन दिवसांपूर्वी बाधित निघाले होते.

त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला हजेरी लावली होती. या कीर्तनात सोनेगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

तसेच आसपासच्या धनेगाव, वंजारवाडी, तरडगाव येथील ग्रामस्थही आले होते. या सर्वांवर कळस म्हणजे बाधित व्यक्तीनेच महाप्रसाद वाटपाचे काम केले.आणि गावातील ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment