Vande Bharat Train: भारतामध्ये एक ते दोन वर्षापासून रेल्वे प्रवासात मोठ्या प्रमाणावर क्रांती कडून आली असून यामध्ये वंदे भारत ट्रेनचा वाटा खूप मोठा आहे. संपूर्ण भारतामध्ये एकूण 136 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सध्या सुरू असून महाराष्ट्रात देखील महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आलेले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रासाठी अजून एक महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून त्यासंबंधीची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळावी याकरिता वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार आहे व या मार्गावर असलेल्या प्रवाशांची वाढती गर्दी पाहून हा निर्णय नक्कीच फायद्याचा ठरणार आहे.

विशेष म्हणजे या मार्गावर सुरू होणाऱ्या वंदे भारत ट्रेनला जळगाव आणि भुसावळ या ठिकाणी देखील थांबा असण्याची शक्यता समोर आली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा रेल्वेकडून झाली नसली तरी देखील लवकरच या मार्गावर वंदे भारत सुरू होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संपूर्ण भारतामध्ये वंदे भारत ट्रेनला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून लवकरच आता या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होत असल्याने जळगावकरांना देखील वंदे भारत ट्रेनची असलेली प्रतीक्षा संपणार आहे.
काय असणार मुंबई-नागपूर वंदे भारत ट्रेनचे फायदे?
मुंबई आणि नागपूर यामधील जर आपण अंतर बघितले तर ते एकूण 837 किलोमीटरचे आहे. सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना 14 ते 20 तासांचा कालावधी लागतो. परंतु येणाऱ्या काळात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास फक्त नऊ तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
तसेच खानदेशकरांसाठी महत्त्वाचे असलेले भुसावळ आणि जळगावहून जर मुंबईला प्रवास करायचा असेल तर सात ते आठ तासाचा कालावधी लागतो. परंतु वंदे भारत मुळे या प्रवासात तीन ते चार तासांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे व प्रवास देखील आरामदायी होणार आहे.
मुंबई-नागपूर वंदे भारत किती स्थानकांवर थांबेल?
नागपूर ते मुंबई दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 160 किमी प्रति तास वेगाने धावणारी असून मुंबई ते नागपूर दरम्यान ही ट्रेन आठ स्थानकांवर थांबेल. यामध्ये वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या स्थानकांचा समावेश असणार आहे.
कशी असेल ही वंदे भारत एक्सप्रेस?
मुंबई- नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला एकूण आठ बोगी असतील व त्यामध्ये एक बोगी एक्झिक्युटिव्ह एसी असणार आहे तर उरलेल्या सात बोगी या एसी चेअर कार असतील.
किती असेल तिकीट दर?
या वंदे भारत एक्सप्रेसचा तिकीट दर पाहिला तर तो एसी चेअर कारसाठी अंदाजे 1500 ते 2000 रुपये इतका असेल व एक्झिक्यूटिव्ह एसी बोगीची तिकीट 2500 ते 3500 इतके असण्याची शक्यता आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे तिकिटांच्या किमती बाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.