अत्यंत महत्वाचे ! तुम्हाला कोरोना लस मिळणार पण त्यासाठी करावे लागणार ‘हे’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  कोविड -19 मधून बरे झालेल्यांना मजबूत रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी एक व्हॅक्सिन शॉट घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

ज्यांची पॉसिटीव्ह चाचणी आली आहेत त्यांना लक्षणे संपल्यानंतर 14 दिवसांनी लसी दिली पाहिजे. सर्व लाभार्थ्यांना लसीकरणासाठी अधिकृतपणे नोंदणी करावी लागेल. याशिवाय त्या ठिकाणी फोटो आयडी न दाखवणाऱ्यांना ही लस दिली जाणार नाही.

अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे की, ऑगस्टपर्यंत केंद्र सरकार 30 कोटी लोकांच्या लसीकरणावर 13,000 कोटी रुपये खर्च करेल. पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. बिहार आणि केरळ सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांना ही लस विनामूल्य मिळण्याची घोषणा केली आहे.

लवकरच इतर राज्येही अशी घोषणा करू शकतात. मंत्रालयाने अशी चुचना केली आहे की, बरे झालेल्या रूग्णांनीही लस घ्यावी. हे या रोगाविरूद्ध रोगप्रतिकारक प्रतिक्रियेत वाढ करण्यास मदत करेल. मंत्रालयाच्या मते, जे लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांनी लक्षणे कमी झाल्यानंतर 14 दिवसांनी लस घ्यावी.

कारण ते लोक लसीकरण करण्याच्या ठिकाणी गेले तर इतर लोकांमध्ये आजार पसरण्याचा धोका वाढवतील. या व्यतिरिक्त, व्यक्तीस लसीकरण पूर्ण करण्यासाठी 28 दिवसांच्या अंतराने लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. कोविड -19 लसच्या दुसऱ्या डोसनंतर दोन आठवड्यांनंतर एंटीबॉडी लेवल सामान्यत: विकसित होते.

प्रथम लस कोणाला मिळेल? :- सुरुवातीच्या टप्प्यात प्राथमिकता गट – आरोग्य आणि आघाडीच्या कामगारांना ही लस दिली जाईल, असा पुनरुच्चार सरकारने केला आहे. लस उपलब्धतेनुसार, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देखील लवकर लशीकरण सुरू होईल.

असे सांगितले गेले आहे की 50 हून अधिक वयाच्या लोकांना दोन उप-गटात विभागले जातील – 60 आणि त्यापेक्षा जास्त वयाचे प्रथम लसीकरण केले जाईल आणि त्यानंतर 50-60 या वयोगटात लशीकरण होईल. त्यात म्हटले आहे की पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे लसीची जागा आणि वेळ याबद्दल माहिती दिली जाईल.

आरोग्य आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या बाबतीत मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की त्यांच्या कुटुंबियांना नंतरच्या टप्प्यात ही लस दिली जाईल. मंत्रालयाने म्हटले आहे की लाभार्थ्यांनी कोणत्याही सरकारी कार्यक्रमात किंवा खाजगी सुविधेत लसीकरण केले आहे की नाही याची माहिती सरकारला देणे बंधनकारक असेल. असे म्हटले आहे की लसीकरणासाठी लाभार्थ्यांची नोंदणी अनिवार्य आहे.

सरकारने काही सामान्य वाईट रिएक्शन देखील सांगितल्या आहेत – एखाद्याला लस दिल्यानंतर ताप, शरीरावर वेदना होऊ शकते. ते म्हणाले की, लोकांना लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रावर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही समस्या असल्यास जवळच्या आरोग्य प्राधिकरण / एएनएम / आशा यांना कळवा.

रजिस्ट्रेशन साठी आवश्यक कागदपत्रे :- या प्रक्रियेसंदर्भात बोलताना केंद्राने म्हटले आहे की नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे या दहापैकी कोणतेही असू शकतात – ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्र, मतदार ओळखपत्र,

खासदार / आमदार / एमएलसीची अधिकृत ओळखपत्र, कामगार सेवा मंत्रालयाने जारी केलेले सर्व्हिस आयडी कार्ड आणि आरोग्य विमा स्मार्ट कार्ड. लसीकरणाच्या ठिकाणी व्यक्तीची नोंदणी आणि पडताळणी करण्यासाठी फोटो आयडी आवश्यक असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment