काय सांगता ! लग्न करा आणि सरकारकडून मिळवा ४ लाख रुपये, वाचा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  भारतात लग्नासाठी खूप खर्च केला जातो. एक मोठा सोहळाच भारतीयांसाठी हा असतो. मुलीचे लग्न असो किंवा घरात मुलाचे लग्न असो, हा एक प्रसंग आहे जेव्हा पैसे खर्च करण्यास विचार केला जात नाही.

वास्तविक, विवाह हा भारतीय जीवनशैलीमधील विशेष प्रसंग मानला जातो. विवाहावेळी खर्च हा ठरलेलाच असतो. पण असा एक देश आहे जिथे आपल्याला लग्न करण्यासाठी पैसे दिले जातात. जपान या देशामध्ये मध्ये लग्न केले तर ४.२५ लाख रुपये दिले जातात. चला या योजनेविषयी संपूर्ण वास्तव जाणून घेऊया.-

हा आहे जापान सरकारचा उद्देश :- घटता जन्म दर आणि वृद्धांची वाढती लोकसंख्या लोकसंख्या यावर आता जपान सरकारने मात करण्याचे ठरवले आहे. लग्न करून संसार थाटण्यास इच्छुक जोडप्यांना जपान सरकारकडून सहा लाख येन म्हणजे जवळपास ४.२५ लाख रुपये देण्यात येणार आहे. जेणेकरून लग्न करून लवकरात लवकर मूल जन्माला यावे आणि घटत्या जन्मदरावर नियंत्रण मिळवता येईल अशी सरकारला अपेक्षा आहे.

वयोवृद्ध माणसांचा देश :- जपानमध्ये १०० हून अधिक वयोमान असणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. लॅसेंटच्या अभ्यासानुसार, जन्मदराची हीच स्थिती कायम राहिल्यास जपानमध्ये २०४० या वर्षात वयस्कर मंडळींची संख्या ही लोकसंख्येच्या ३५ टक्क्यांहून अधिक असणार आहे. हा संभाव्य धोका कमी करण्यासाठी जपान सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

किती आहे जन्मदर :- मागील वर्षी जपानमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी ८ लाख ६५ हजार बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली. तर, त्या तुलनेत मृत्यूची संख्या ही पाच लाख १२ हजारांहून अधिक होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जन्मदर अधिक असण्याची अपेक्षा सरकारला आहे.

मागील वर्षी जपानमध्ये १.४२ इतका जन्मदर होता. तर, या वर्षी यात वाढ होऊन १.८० इतका असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जपानची लोकसंख्या १२.६८ कोटी इतकी असून वयोमानाप्रमाणे जपान हा जगातील सर्वाधिक वयस्कर लोकसंख्येचा देश आहे.

कोणाला मिळेल फायदा :- या योजनेत सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. यामध्ये जोडप्यांचे वय ४० हून अधिक असता कामा नये. त्याशिवाय दोघांचेही एकत्रित उत्पन्न ३८ लाखांहून अधिक असता कामा नये. त्याशिवाय ज्या जोडप्यांचे वय ३५ हून कमी असेल त्यांचे उत्पन्न ३३ लाखांहून अधिक असता कामा नये. त्यांना २.११ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment