अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : हेपेटायटिस म्हणजे रक्तातील कावीळ. रक्तातील कावीळचं प्रमाण वाढल्यास लिव्हर कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. मुंबईमध्ये लिव्हर कॅन्सरच्या घटना इतर शहरांच्या तुलनेमध्ये जास्त आढळतात.
वेळीच कळलं तर मात्र या आजारावर वेळीच उपचार होऊ शकतात. म्हणूनच हेपेटायटिस असलेल्या व्यक्तीने काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी माहिती घेऊ या.
» उच्च प्रमाणात सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट्स असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे.
» साखर ग्रहण करणे निरोगी लिव्हरच्या दृष्टीने मर्यादित करावे. यामध्ये कृत्रिम स्विटनर्स व फ्रुट ज्युसचा समावेश होतो. ज्युसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, जे पचवणे हेपेटायटिसने बाधीत लिव्हरसाठी कठीण होऊ शकते.
» हेपेटायटिस असलेल्या रुग्णांच्या आहारामध्ये मांस खाणे विशेषत: रेड मीट खाणे टाळले पाहिजे. तुम्हाला हवेच असेल तर तुम्ही एग व्हाईट्स आणि लीन मिट्स खाऊ शकता पण आठवडयातून एकदा किंवा दोनदा.
» निरोगी लिव्हरसाठी अल्कोहोल आणि सिगारेट टाळावी.
» व्हिटामीन सप्लिमेंट्स किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जादा औषध घेणे टाळावे.
» अन्न खाणे टाळू नये. लहान लहान भागांमध्ये अन्न ग्रहण करावे आणि मोठया प्रमाणात पाणी प्यावे व पुरेशी विश्रांती घ्यावी.
» हेपेटिटीस असताना बाहेर खाणे टाळावे.
» अन्न ताजे असण्याची आणि स्वच्छ ठिकाणी तयार केले गेल्याची खात्री करून घ्यावी.
» हेपेटायटिसच्या दरम्यान कोणते अन्नपदार्थ खावेत
» अख्खे धान्य खाणे हेपेटायटिससाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews