मटण दिल्यावर रुग्ण घरी कशाला जाईल ? असा प्रश्न विचारात शरद पवार आमदार लंकेना म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- खारे कर्जुने लष्करी सराव क्षेत्राच्या (के. के. रेंज) प्रश्नावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या समवेत खासदार पवार यांची गुरुवारी सकाळी १० वाजता बैठक होणार आहे.

या बैठकीस आमदार नीलेश लंके यांच्यासह राहुरी व नगर तालुक्याचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी खासदार शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेऊन साकडे घातले.

यावेळी खासदार पवार यांनी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १ हजार बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरची माहिती घेतली.

दररोज किती रुग्ण भरती होतात, खर्चाची तोंडमिळवणी कशी करता, काय सुविधा देता याची बारीकसारीक माहिती त्यांनी घेतली.

तेथे दाखल झालेल्या रुग्णांना मटण तसेच मटण सूप दिले जात असल्याचे आमदार लंके यांनी सांगितल्यानंतर मटण दिल्यावर रुग्ण घरी कशाला जाईल, अशी मिस्कील करीत पवार यांनी लंके यांच्या कामाचे कौतुक केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment