अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- सध्या बिहारमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप चालूच आहेत.
भाजपनेही आपल्यावतीने विविध आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे.परंतु यातीलच एक आश्वासनावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचे काम विरोधी पक्षाने सुरु केले आहे.
भाजपने नुकतेच बिहारमध्ये भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे.त्याच पार्श्वभूमीवर भाजप पूर्णपणे अडकत असल्याचे दिसून येत आहे.
यावर केंद्रातील मोदी सरकार बिहार निवडणुकीत कोरोना लसीचे राजकारण करत असून मोफत लस म्हणजे जुमलाच असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारला केली.
तसेच महाराष्ट्रात निवडणूका नसल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला कोरोनावरील लस देणार नाही का?महाराष्ट्र वाऱ्यावर सोडणार का ? असा सवालही उपस्थित केला आहे.
राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व भारतीयांना लस देण्यासाठी सरकारची तयारी आहे, असे सांगितले असताना बिहारच्या लोकांनाच मोफत लस देऊ असे आश्वासन जाहिरनाम्यात दिले.
यावरून भाजपाचा नेमका हेतू काय आहे? हे स्पष्ट करावे असेही ते म्हणाले. समाजवादी पार्टी, काँग्रेस, सीपीआयसह दुसऱ्या दलांनी भाजपवर निशाना साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप कोरोनाचे राजकारण करीत आहे.
अखिलेश म्हणाले की, भाजप हे वचन उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील नागरिकांना का देत नाही. तर काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, भाजप बिहारमधील जनतेच्या भावनांशी खेळत आहे.
अखिलेश यांनी ट्विट केलं की, ‘आज देशाच्या सत्ताधारी भाजपने बिहार निवडणुकीत आपल्या घोषणापत्रात म्हटले आहे की, ते बिहारच्या लोकांसाठी कोरोना लस मोफत उपलब्ध करणार आहे. अशी घोषणा यूपी आणि अन्य राज्यांसाठी का केली जात नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved