अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. मात्र या काळातही बँकांचे कामकाज काहीशे सुरूच होते.
कोरोनामुळे अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला होता. दरम्यान कोरोनाकाळातही सणउत्सव पार पडत असून दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

यामुळे जिल्ह्यातील एका बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वच बोनस जाहीर करत एक सुखद धक्का दिला आहे. अहमदनगर जिल्हयातील
कोपरगाव पीपल्स को ऑपरेटिव्ह बँकेने दिवाळीपूर्वीच आपल्या सेवकांना 20 टक्के बोनस व सानुग्रह अनुदान व अडीच लाख रुपयांचे कोविड विमा संरक्षण जाहीर केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अतुल काले यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, मार्च, 2020 अखेर बँकेकडे 548.35 लाख भांडवल,ठेवी 266 कोटी 47 लाख, कर्ज वाटप 124 कोटी 94 लाख, गुंतवणूक 162 कोटी 13 लाख व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा 2 कोटी 87 लाख इतका आहे.
बँकेने नुकतेच नवीन अद्यावत सॉफ्टवेअर प्रणाली घेतली आहे. याचा निश्चितच ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास फायदा होणार आहे.
तसेच बँकेने कर्जावरील व्याजदर कमी करुन व्यावसायीक कर्ज 9 टक्के सोनेतारण कर्ज 8.50, व गृहकर्ज 10 टक्के करण्यात आल्याचे ही चेअरमन अतुल काले यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved