उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील घ्या ‘या’ निसर्गाच्या कुशीत लपलेल्या सुंदर तलावांचे दर्शन; जीवनातील चिंता आणि तणाव झटक्यात होतील दूर

Ajay Patil
Published:

निसर्ग आणि निसर्गाची रूपे वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाचे चटके सहन करत असतो व त्या चटक्यांपासून किंवा उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळावा याकरिता आपण थंड हवेचे ठिकाणे आणि हिल स्टेशन इत्यादी ठिकाणी भेटी देतो.

त्याचप्रमाणे पावसाळ्यात आपण अनेक ठिकाणी असलेले धबधबे तसेच गडकिल्ले, नैसर्गिक परिसर व इतर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हिरवाईचा अनुभव घेण्यासाठी जात असतो. परंतु काही ठिकाणे असे असतात की तुम्ही उन्हाळा असो की पावसाळा त्या ठिकाणी जाऊन काही क्षण  निसर्गाच्या सानिध्यात घालवून दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव आणि चिंता यापासून काही कालावधी करिता तरी मुक्तता मिळवू शकतात.

याच प्रकारच्या  नैसर्गिक स्थळांचा आपण विचार केला तर यामध्ये महाराष्ट्रात असणारे काही तलाव खूप महत्त्वपूर्ण असून ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे कुटुंब किंवा मित्रांसोबत उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील जाऊन त्या ठिकाणच्या नैसर्गिक सौंदर्याचे अनुभूती घेऊ शकतात.

 उन्हाळा असो की पावसाळा या तलावांना भेट म्हणजे निसर्गसौंदर्याचा असतो वेगळाच अनुभव

1- वेण्णा तलाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर तलावांमध्ये वेण्णा तलावाचा समावेश केला जातो. तुम्ही जर महाबळेश्वर फिरायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला वेण्णा तलाव देखील पाहता येतो. महाबळेश्वर या ठिकाणी असलेला हा तलाव सुमारे 28 एकरावर पसरलेला असून त्याचे नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासारखे आहे व मनाला मोहून टाकेल असे आहे. या तलावाच्या सभोवताली अतिशय हिरवळ असते व ती उन्हाळ्यात जशी सुखद अनुभव देते तशी ती पावसाळ्यात देखील देते.

2- पवई तलाव हा देखील महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय तलावांपैकी एक असून मुंबई शहरात वसलेला आहे. या ठिकाणी तीनही ऋतूंमध्ये पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पवई तलावाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कृत्रिम तलाव असून मिठी नदीवर 1891 मध्ये जी काही दोन धरणे बांधण्यात आली होती

त्यामुळे हा तलाव तयार झाल्याचे बोलले जाते. मुंबईतील हा सर्वात मोठा तलाव असल्याचे देखील म्हणतात. पवई तलावाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या भोवताली गवताळ प्रदेश आणि हिरवळ असल्यामुळे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये आणखीन भर पडते. त्यामध्ये तर या ठिकाणचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते.

3- अंबाझरी तलाव संत्री नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरामध्ये अंबाझरी तलाव असून नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालण्यामागे या तलावाची महत्त्वाची भूमिका आहे. नागपूरच्या दक्षिण पश्चिम सीमेजवळ अंबाझरी तलाव असून नागपूर मध्ये असलेल्या 11 तलावांपैकी हा सर्वात मोठा तलाव मानला जातो.

विशेष म्हणजे नागपूरची जी काही नाग नदी आहे तिचा उगम याच अंबाझरी तलावातून होतो असे म्हटले जाते. अंबाझरी तलावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणचे शांत वातावरण आणि हिरवळ पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करते.

4- लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा तलाव किंवा हे सरोवर असून जवळपास ते पाच हजार वर्षापेक्षा जुने आहे असे म्हटले जाते. तसेच लोणार सरोवराची निर्मिती कशी झाली याबद्दल जर पाहिले तर एका उल्कापिंडीची पृथ्वीशी टक्कर झाल्यामुळे हे सरोवर तयार झाल्याचे म्हटले जाते.

लोणार सरोवराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सतत आपला रंग बदलत असते. लोणार सरोवराच्या आजूबाजूला असलेले पर्वत आणि गवताळ प्रदेश त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये आणखीन भर घालतात व त्यामुळे पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. लोणार सरोवर भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असे सरोवर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe