Accident Policy: एक्सीडेंट पॉलिसी घ्या परंतु ‘या’ गोष्टींचा अवश्य विचार करा! तेव्हाच मिळेल गरजेला पगाराप्रमाणे पैसा

Published on -

Accident Policy:- जीवनामध्ये केव्हा काय होईल याचा आपल्याला काहीच अंदाज नसतो किंवा आपल्याला काहीच सांगता येत नाही.कारण आयुष्यामध्ये केव्हा कोणता प्रसंग व्यक्तीवर कोसळेल आणि चांगले चालणारे आयुष्य केव्हा विस्कळीत होईल याचा काही भरवसा नसतो.

त्यामुळे या आयुष्याच्या अनिश्चित कालीन परिस्थितीमुळे बरेच जण  अनेक पॉलिसींच्या माध्यमातून आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न बरेच जण करतात व यामध्ये एक्सीडेंट पॉलिसी म्हणजेच अपघात विमा हा देखील एक महत्त्वाचा असतो. कारण बऱ्याचदा जीवनामध्ये माणसाला एखादा अपघात होतो व त्यामुळे कायमस्वरूपी, कायमचे आंशिक अपंगत्व किंवा तात्पुरते अपंगत्व येऊ शकते.

जर असे झाले तर मग आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम होतो. अशी घटना घडल्यामुळे काम बंद होते व पैसा येणे देखील बंद झाल्यामुळे घर भाड्यापासून तर एखाद्या कर्जाचा हप्ता या व इतर आवश्यक आर्थिक गरजांसाठी पैसा राहत नाही व खूप बिकट परिस्थिती होते.

त्यामुळे अपघात पॉलिसी म्हणजेच एक्सीडेंट पॉलिसी घेणे खूप महत्त्वाचे असते. याकरिता तुम्ही जीवन विमा किंवा आरोग्य विमा यापैकी एका वर रायडर घेऊ शकतात. परंतु याकरिता तुम्हाला या पॉलिसीमध्ये काही गोष्टींचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. त्याचेच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 एक्सीडेंट पॉलिसीमध्ये या गोष्टींचा समावेश करावा

1- कायमचे अपंगत्व आले तर यामध्ये तुमच्याकडे कायमस्वरूपी अपंगत्वाचे धोरण असणे आवश्यक असते. दुर्दैवाने एखाद्या अपघातामध्ये जर कायमचे अपंगत्व आले तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्याकरिता आयुष्यभर पैसे मिळवू शकणार नाहीत. जर आपण काही आरोग्य विमा पोलिसांचा विचार केला तर बहुतेक पॉलिसींमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व समाविष्ट केलेले नसते.

याकरिता तुम्ही तुमच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसी सोबतच कायमस्वरूपी अपंगत्वाचा समावेश यामध्ये करणे गरजेचे असते. या अंतर्गत एखाद्या अपघातात दुर्दैवाने अपंगत्व आले तर तुम्हाला एक तर प्रति महिना ठराविक रक्कम देण्याचा पर्याय तरी मिळतो व या माध्यमातून तुम्हाला दाव्याची पूर्ण रक्कम एकाच वेळ तरी मिळते.

2- कायमचे आंशिक अपंगत्व आले तर बरेचदा एखादा मोठा अपघात होतो व व्यक्तीला कायमचे काही अंशी अपंगत्व येते. यामध्ये व्यक्तीला हात, पाय, डोळे तसेच कान इत्यादी कोणत्याही अवयवाला अपंगत्व असू शकते. त्यामुळे तुम्हाला पूर्वीसारखे दैनंदिन काम करता येत नाही व साहजिकच तुम्ही पूर्वीसारखे पैसे मिळवू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये या संबंधित रायडरचा देखील समावेश करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला अशी परिस्थिती उद्भवली तर पैशांची अडचण येणार नाही.

3- तात्पुरते एकूण अपंगत्व एखाद्या वेळी अपघातात काही काळ पूर्ण अपंगत्वाचा सामना करावा लागतो. म्हणजेच एखाद्या अपघातामुळे काही महिने अंथरुणावर पडून राहावे लागते व पूर्ण आराम करावा लागतो. अशा पद्धतीच्या अपंगत्वामध्ये तुम्ही पूर्णपणे बरे होईपर्यंत तुमच्या कुटुंबाला पैशांचा आधार मिळवू शकत नाही. तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या पूर्ण अपंगत्वाकरिता देखील निश्चितपणे पॉलिसी घेणे गरजेचे आहे.

4- उपचार सुरू असताना हॉस्पिटलमधील खर्च तुम्ही तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये उपचारादरम्यान होणारा दैनंदिन दवाखान्याचा खर्च देखील समाविष्ट करणे गरजेचे आहे. यामध्ये येण्या-जाण्याचा तसेच कुटुंबातील सदस्यांची निवास व्यवस्था आणि उपचारादरम्यानच्या इतर खर्चाचा देखील समावेश असतो. तसेच तुम्ही हॉस्पिटलमध्ये  ऍडमिट असतात तितक्या कालावधी करिता काही अतिरिक्त खर्चाची भरपाई या माध्यमातून केली जाऊ शकते.

5- कर्ज संरक्षण लाभ घ्यावा प्रत्येक व्यक्तीवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कर्ज असते. अशा परिस्थितीमध्ये जर अपघात झाला व अपंगत्व आले तर कर्जाचे हप्ते फेडण्यास व्यक्ती असमर्थ ठरते. अशावेळी जर तुम्ही होम लोन किंवा कार लोन घेतले असेल तर घर आणि कार इत्यादी मालमत्ता धोक्यात येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये कर्ज संरक्षण घेणारा रायडर किंवा वैशिष्ट्य समाविष्ट केले असेल तर त्याचा फायदा होतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा मिळून तुम्ही वेळेवर इएमआय भरू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe