Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
bank account rule

Bank Account Rules: तुमचे देखील एकापेक्षा जास्त बँक खाते आहेत का? असतील तर होऊ शकते ‘हे’ नुकसान

Sunday, December 24, 2023, 8:33 AM by Ajay Patil

Bank Account Rules:-सर्वसामान्य लोकांपासून ते उच्च मध्यमवर्ग लोकांचे बँकेमध्ये खाते असतात. आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बँकेत खाते असणे ही काळाची गरज आहे. आपल्याला माहित आहेस की बँक खात्याचे बचत खाते, पगार खाते आणि चालू खाते असे प्रकार पडतात.

यामध्ये जर आपण पाहिले तर जो काही नोकरदार वर्ग आहे अशा वर्गाचे एका पेक्षा जास्त बँकांमध्ये खाती दिसून येतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे एक सॅलरी अकाउंट असतेच. परंतु त्या व्यतिरिक्त इतर बँकांमध्ये बचत खाते देखील असतात. परंतु जर आपण बँक खात्याच्या बाबतीत पाहिले तर याबाबतीत देखील काही नियम आहेत.

bank account rule
bank account rule

समजा तुमचे सॅलरी अकाउंट आहे व त्या अकाउंट मध्ये जर तीन महिन्यापर्यंत पगार झाला नाही तर बँक त्या खात्याला बचत खाते म्हणून ओळखते. सॅलरी अकाउंटमध्ये तुमची शिल्लक रक्कम शून्य झाली तरी कुठल्याही प्रकारचा दंड वगैरे लागत नाही. पण जर तुमचे सेविंग अर्थात बचत खाते असेल तर मात्र त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी काही रक्कम ठेवणे गरजेचे असते.

असे अनेक प्रकारचे नियम बँक खात्याच्या बाबतीत आपल्याला दिसून येतात. या अनुषंगाने या लेखामध्ये जर तुमचे एका पेक्षा जास्त बचत खाते असतील तर मात्र काही बाबतीत तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. याबद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर काय नुकसान होऊ शकते?

1- बचत खात्यामध्ये किमान रक्कम ठेवावी लागते व त्यामुळे होणारे नुकसान– समजा तुमचे एकापेक्षा जास्त बचत खाते असतील तर तुम्हाला प्रत्येक खात्यामध्ये ते खाते व्यवस्थित सांभाळण्याकरिता त्यामध्ये एक ठराविक रक्कम ठेवणे गरजेचे असते.

त्यामुळे तुमची एकापेक्षा जास्त बचत खाते असतील तर त्या प्रत्येक खात्यामध्ये तुमची एक ठराविक रक्कम अडकून राहते व या अडकलेल्या रकमेवर तुम्हाला पाच ते सहा टक्के इतका परतावा मिळतो. परंतु हीच रक्कम जर तुम्ही इतर वेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवली तर तुम्हाला यापेक्षा जास्त फायदा होईल.

2- सिबिल स्कोरवर होतो परिणाम– एका पेक्षा जास्त खात्यांमध्ये तुमची काही रक्कम अडकून तर जातेच परंतु त्याचा फायदा देखील कमी होतो.परंतु तुमच्या सिबिल वर मात्र त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा खात्यांमध्ये जर तुम्ही कमीत कमी रक्कम ठेवली नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोर खराब होतो व तुमचे खाते हे निष्क्रिय होऊन जाते.

3- टॅक्स भरताना त्रासदायक– तुमचे एका पेक्षा जास्त बँका खाते असतील तर कर भरताना तुम्हाला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. जेव्हा तुम्ही आयकर भरत असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व बँक खात्यांची माहिती जपून ठेवणे गरजेचे असते. अशावेळी तुम्हाला बऱ्याचदा त्या बँक खात्यांच्या स्टेटमेंटच्या नोंदी गोळा कराव्या लागतात.

4- वार्षिक देखभाल फी आणि सेवा शुल्क भरणे– तसेच विविध बँकांमध्ये असलेल्या खात्यासाठी तुम्हाला वार्षिक देखभाल फी आणि सेवा शुल्क देखील भरावे लागते. बँकेकडून तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या व्यतिरिक्त ज्या काही सुविधा दिल्या जातात त्या सुविधांसाठी देखील तुम्हाला बँकेला पैसे द्यावे लागतात व या ठिकाणी फार मोठे नुकसान होते.

5- निष्क्रिय खाते न वापरल्याने होऊ शकते फसवणूक– एका पेक्षा जास्त बँक खाते असतील ही बाब आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. आता बरेच जण नेट बँकिंगच्या द्वारे खाते चालवत असतात. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक बँक खात्याचा नेट बँकिंगचा पासवर्ड लक्षात ठेवणे देखील अवघड होऊन जाते.

अशाप्रकारे निष्क्रिय खाते जर वापरले नाही तर त्यापासून देखील नुकसान होण्याची शक्यता असते. कारण अशा  खात्याचा पासवर्ड आपण बरेच दिवस बदलत नाहीत. अशावेळी बाकीचे खाते बंद करणे व त्यांचे नेट बँकिंग हटवणे फायद्याचे ठरते.

 अशा पद्धतीने तुमचे एका पेक्षा जास्त बँक खाते असतील तर तुमचे नुकसान होऊ शकते.

Categories आर्थिक Tags bank account, Bank Account Rule, salary account, Saving Account, State Bank Of India
मोटिवेशनल स्पीकर आणि प्रसिद्ध युट्युबर विवेक बिंद्राचे शिक्षण किती झालयं ? पहा…
Corona JN.1 Variant : अशी आहेत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धक्कादायक लक्षणे
© 2026 AhmednagarLive24 • Built with GeneratePress