Home Loan EMI : बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने किरकोळ कर्जांना प्रोत्साहन देण्यासाठी, 12 ऑगस्ट रोजी गृह कर्ज आणि कार कर्जाच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. सरकारी बँकेने गृह आणि कार कर्जासाठी 20 बेस पॉइंट्स (bps) पर्यंत कर्जदरात कपात केली आहे. नवीन दर 14 ऑगस्ट 2023 पासून लागू होणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) ने शनिवारी गृह आणि कार कर्जावरील व्याजदरात 0.20% पर्यंत कपात केली आहे. याशिवाय बँकेने प्रक्रिया शुल्कही माफ करण्याची घोषणा केली.
या कपातीमुळे, गृहकर्ज सध्याच्या 8.60% ऐवजी 8.50% वर उपलब्ध होईल. दुसरीकडे, कार कर्ज 0.20% ने कमी करून 8.70% केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन दर 14 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. बँकेच्या या घोषणेनंतर ग्राहक खुश झाले आहेत.
बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कमी व्याजदराचे दुहेरी फायदे आणि प्रक्रिया शुल्क माफ केल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. तसेच यामुळे ग्राहकांना कर्ज घेण्यास देखील प्रोत्साहन मिळेल.
बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, बँक ऑफ महाराष्ट्रने शनिवारी गृह आणि कार कर्जावरील व्याजदरात 0.20 टक्क्यांपर्यंत कपात केली. याशिवाय बँकेने शून्य प्रक्रिया शुल्कही जाहीर केले. या कपातीमुळे, गृहकर्ज सध्याच्या 8.60 टक्क्यांऐवजी आता 8.50 टक्के दराने उपलब्ध होईल. दुसरीकडे, कार कर्ज 0.20 टक्के ते 8.70 टक्क्यांनी स्वस्त करण्यात आले आहे. तसेच नवीन दर 14 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
MCLR मध्ये वाढ
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 10 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या पतधोरण आढाव्यात मुख्य धोरण दर रेपो रेट 6.50% वर कायम ठेवला आहे. असे असूनही बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने शुक्रवारी MCLR 0.10% ने वाढवला आहे. यासह, एक वर्षाचा MCLR 8.50% वरून 8.60% झाला आहे. सुधारित दर 10 ऑगस्टपासून लागू झाले आहेत.