तुमचा देखील पीएफ कापला जात असेल तर तुम्हाला मिळू शकतो 7 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा! काय आहे EPFO ची योजना?

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये कर्मचारी काम करतात व या कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ करिता काही रक्कम पगारातून कापली जाते व ती संबंधित कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होते.

या सगळ्या पीएफ खात्यांचे  नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून केली जाते हे आपल्याला माहिती आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की जर तुमचा पीएफ कापला जात असेल तर तुम्हाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या एम्पलोय डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स अर्थात

EDLI योजनेच्या माध्यमातून सात लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा मिळू शकतो. ईपीएफओच्या माध्यमातून सर्व सदस्यांना या योजनेअंतर्गत जीवन विम्याची सुविधा प्रदान करण्यात येते. त्यामुळे या लेखात आपण याविषयीची संपूर्ण माहिती बघू.

 ईपीएफओ सदस्याला मिळते सात लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण

जर तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम करत आहात व तुमचा देखील पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंड कापला जात असेल तर तुम्हाला ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EDLI योजनेअंतर्गत जीवन विम्याचा लाभ मिळू शकतो.

ही योजना ईपीएफओने 1976 मध्ये सुरू केली होती व या अंतर्गत जर ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाला तर त्या सदस्याच्या कुटुंबाला जमा केलेली रक्कम दिली जात होती व विमा संरक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते.

EDLI योजनेत विम्याची रक्कम कशी ठरते?

यामध्ये विम्याची रक्कम ठरवताना मागील बारा महिन्यांची बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ पगार आणि महागाई भत्ता यावर ती ठरवली जाते. यामध्ये विमा संरक्षणाचा दावा हा शेवटचे मूळ वेतन+DA च्या 35 पट आहे. इतकेच नाही तर दावेदाराला एक लाख 75 हजार रुपयांपर्यंतची बोनस रक्कम देखील दिली जाते.

 EDLI योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाची अट

जोपर्यंत संबंधित व्यक्ती नोकरी करत आहे तोपर्यंतच ईपीएफओ सदस्याला या योजनेत समाविष्ट केले जाते. नोकरी सोडल्यानंतर त्याचे कुटुंब/ वारस यामध्ये विमा दावा करू शकत नाही. ईपीएफो सदस्य बारा महिने सतत काम करत असेल तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर नॉमिलीला किमान अडीच लाख रुपयांचा फायदा मिळतो.

 या योजनेअंतर्गत कधी दावा करता येतो?

ईपीएफओ सदस्याचा मृत्यू काम करताना, एखादा आजार, एक्सीडेंट किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तरच सदस्याचे कुटुंब या योजनेअंतर्गत विम्या करिता दावा करू शकते. परंतु या योजनेअंतर्गत जर कोणतेही नामांकन असेल तर  या विम्याचा कव्हरेज मृत कर्मचाऱ्याचा पती/पत्नी, अविवाहित मुली आणि अल्पवयीन मुलगा/ मुलगी यांना मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe