Chandrayaan-3 : चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर शेअर्समध्ये कमालीची वाढ; ‘हा’ शेअर बनला रॉकेट !

Ahmednagarlive24
Published:

Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं अखेर सोनं झालं आहे. चांद्रयान 2 मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान 3 च्या माध्यमातून भरून काढण्यात आलं.

दरम्यान, चांद्रयानच्या या यशस्वी कामगिरीमुळे काही शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली. यामुळे, काही शेअर रॉकेटच्या स्पीडने पुढे पाळताना दिसत आहेत. असाच एक शेअर सध्या पुढे पळताना दिसत आहे, आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये आज, 24 ऑगस्ट रोजी 10 टक्क्यांहून अधिक मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या हा शेअर NSE वर 9.47 टक्क्यांच्या वाढीसह 1800 रुपयांवर व्यवहार करत आहे. चंद्रावर चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. या यशानंतर आज गुंतवणूकदारांनी शेअरमध्ये जोरदार खरेदी केली आहे.

सेंटम इलेक्ट्रॉनिक्स चांद्रयान मोहिमेतील इलेक्ट्रॉनिक्ससाठी इस्रोचा प्रमुख औद्योगिक भागीदार होता. त्याने इस्रोला महत्वाच्या मॉड्यूल्स आणि प्रणालींचा पुरवठा केला आहे.

सेंटम इलेक्ट्रॉनिक्सचा एकत्रित महसूल प्रथम FY24 मध्ये वार्षिक 17% वाढला. ही तेजी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (ईएमएस) व्यवसायातील वाढीमुळे आहे. तथापि, बिल्ड टू स्पेक (BTS) मधून जास्त महसूल मिळाल्याने गेल्या तिमाहीत तिमाही आधारावर महसूल कमी झाला. EMS व्यवसायातील सुधारित महसुलामुळे EBITDA मार्जिन Q1-FY23 मध्ये 5 टक्क्यांवरून Q1-FY24 मध्ये 7 टक्क्यांपर्यंत वाढले.

सेंटम इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रवर्तकांचा बहुसंख्य हिस्सा 58.8 टक्के आहे. लोकांचा 33.43 टक्के हिस्सा आहे. त्यानंतर DII आणि FII कडे कंपनीत अनुक्रमे 7.66 टक्के आणि 0.11 टक्के हिस्सा आहे.

स्टॉकची कामगिरी

सेंटम इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 215 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 154 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीच्या गुंतवणूकदारांना 307 टक्के इतका चांगला नफा झाला आहे. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत 380% चा जबरदस्त परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe