Pohewala Success Story: ‘या’ दोघ तरुणांनी नोकरी सोडली आणि सुरू केली पोहे विक्री! दर महिन्याला कमावतात 60 लाख, वाचा यशोगाथा

Ajay Patil
Published:
pohewala success story

Pohewala Success Story:- एखादी छोटीशी व्यवसाय कल्पना व्यवस्थित नियोजन करून अमलात आणली तर ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवू शकते हे अटळ सत्य आहे. व्यवसाय छोटा असो की मोठा याला महत्त्व नसून त्या व्यवसायाला मागणी किती आहे आणि त्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केली जात आहे या गोष्टींना खूप महत्त्व असते.

आपल्याला समाजामध्ये असे अनेक व्यावसायिक दिसतील की त्यांनी अगदी छोट्याशा प्रमाणामध्ये एखादा व्यवसायाला सुरुवात केलेली असते व कालांतराने त्या व्यवसायाचे रोपटे वटवृक्षांमध्ये रूपांतरित होताना आपल्याला दिसून येते. साहजिकच यामागे संबंधित व्यक्तींचे अफाट कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणे केलेली मेहनत असते.

याच मुद्द्याला धरून जर आपण फुड स्टार्टअप असलेल्या पोहेवालाचे संस्थापक चाहूल बालपांडे आणि पवन वाडीभस्मे या दोघा तरुणांचे उदाहरण घेतले तर आपल्याला वरील मुद्दा लक्षात येईल. जर आपण या दोघांची कहाणी किंवा यशोगाथा पाहिली तर चाहूल यांनी इंजिनिअरिंग केलेली आहे व पवन यांनी देखील एमबीए केलेले होते.

दोघेही शिक्षण घेऊन एका कंपनीमध्ये काम करत होते. परंतु ज्या ठिकाणी ते काम करत होते त्या ठिकाणहून त्यांना वेळेवर पैसे म्हणजेच पगार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यायला लागत होते.

या समस्येला तोंड देत असतानाच त्यांच्या मनात आले की आपण कष्ट करतो तरी देखील आपल्या कष्टाचा पैसा आपल्याला वेळेवर मिळत नाही. म्हणून काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने ते झपाटलेले होते व यातूनच त्यांना पोहे विकण्याची कल्पना सुचली व सुरू झाला अनोखा प्रवास.

 अशी झाली पोहेवाला ब्रँडची सुरुवात

 चाहूल आणि पवन दोघे दिवसभर ऑफिस मध्ये काम करायचे आणि रात्री पोहे विक्री करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. त्यांच्या या व्यवसायाला खूप कमी कालावधीमध्ये ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळायला लागला. त्यामुळे त्यांनी 2018 मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व पूर्ण वेळ पोहे विक्री करण्याचा निश्चय केला व पोहे विकायला सुरुवात केली.

एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या पोह्याचा ब्रँड पोहेवाला असे केले व अनेक प्रकारचे पोहे ग्राहकांना पुरवले. आज त्यांच्या या व्यवसायातील सातत्य व मेहनतीच्या जोरावर सहा वर्षांमध्ये त्यांनी देशातील पंधरा शहरांमध्ये आऊटलेट म्हणजेच दुकाने सुरू केलीत. आज ते दोघं मिळून प्रत्येक महिन्याला 60 लाखांपेक्षा जास्त कमाई पोहे विक्रीतून करत आहेत.

हा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी मार्केट रिसर्च केले व फूड स्टार्टअपला उज्वल भविष्य असल्याचे त्यांनी हेरले. म्हणून अनुभव यावा याकरिता त्यांनी रात्री छोट्या ठिकाणी पोहे विक्री करायला सुरुवात केली या क्षेत्रातील शक्यता व समस्या जाणून घेतल्या. तसेच ग्राहकांना नेमके काय हवे आहे याची देखील माहिती त्यांनी मिळवली

व त्यानुसार व्यवसायामध्ये बदल केले. जेव्हा त्यांनी सुरुवातीला रात्रीच्या वेळेस पोहे विकायला सुरुवात केली तेव्हा ते रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत पोहे विकायचे. या माध्यमातून त्यांना बाजाराची सखोल माहिती देखील मिळाली व व्यवसायाची आखणी करायला देखील संधी मिळाली. यावेळी ते ग्राहकांच्या आवडीनिवडीकडे बारकाईने लक्ष देत असे.

यातूनच त्यांना ग्राहकांच्या हव्या असलेल्या मागणीच्या माध्यमातून 13 प्रकारचे पोहे तयार करायची कल्पना सुचली. एवढेच  नाही तर सेंद्रिय पोहे विक्रीला सुरुवात करणारे ते पहिले होते. आज त्यांच्या पोहेवाला ब्रँडचे पनीर पोहे, इंदोरी पोहे, नागपूर स्पेशल तारी पोहे, चिवडा पोहे तसेच मिश्र पोहे खूप प्रसिद्ध आहे.

 चाहुल बालपांडे यांनी सांगितली व्यवसायाची रणनीती

 चाहुल बालपांडे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. परंतु व्यवसायामध्ये तुमचा नावीन्यपूर्ण फार्मूला, गुणवत्ता आणि मार्केटिंग इत्यादीचे बारकावे तुम्हाला व्यवसायामध्ये यशस्वी करत असतात.

तुम्हाला कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या अगोदर त्या व्यवसायाची योग्य प्लानिंग करणे महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर ब्रँडची ताकद वाढवण्यासोबतच मार्केटिंग आणि उत्पादनाच्या गुणवत्तेवर भर देणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले होते.

जेव्हा त्यांनी कामाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी स्वतःची वेबसाईट सुरू केली व ऑनलाईन पोहे विकण्यास देखील सुरुवात केली. प्लॅनिंग करून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली व त्याचाच परिणाम म्हणून आज 15 हून अधिक आउटलेट देशभरात त्यांनी उघडले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe