Cibil Score Increase Tips:- तुम्हाला बँकेतून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमधून पर्सनल लोन असो किंवा होम लोन किंवा कुठल्याही प्रकारचे कर्ज जर घ्यायचे असेल तर बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून सगळ्यात अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जातो. यामध्ये जर तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला कर्ज ताबडतोब मिळते.
परंतु जर तुमचा क्रेडिट स्कोर घसरलेला असेल तर मात्र तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे खूप गरजेचे आहे. साधारणपणे क्रेडिट स्कोर साडेसातशे ते 799 दरम्यान असला तर तो चांगला मानला जातो.

परंतु जर तीनशे ते साडेपाचशे अंकांच्या दरम्यान असेल तर मात्र तुमचा स्कोर हा खराब मानला जातो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगला असणे गरजेचे आहे व तुमचा क्रेडिट स्कोर कशा पद्धतीने वाढू शकतो व यासाठी कुठल्या गोष्टी मदत करू शकतील बद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी या गोष्टी पाळा
1- ऑटो डेबिट मोड सुरू करणे– बऱ्याच जणांना एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरायचे सवय असते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला कोणत्या कार्डची ड्यु डेट काय आहे हे लक्षात ठेवणे खूप अवघड जाते.
त्यामुळे बऱ्याचदा आपले बिल भरण्याची तारीख चुकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे क्रेडिट कार्ड बिलांचे ऑटो डेबिट मोड पेमेंट ठेवणे गरजेचे आहे. या ऑटो डेबिटमुळे तुम्ही वेळेवर पैसे भरू शकाल व आकारला जाणाऱ्या दंडापासून देखील तुम्ही स्वतःला वाचवू शकतात. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम राखण्यास मदत होईल.
2- क्रेडिट कार्डवर मिनिमम ड्यू पेमेंट टाळावे– जर तुम्ही क्रेडिट कार्ड नियमितपणे वापरत असाल तर त्या कार्डचे बिल भरले आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा क्रेडिट कार्ड कंपन्या कार्ड सुरू ठेवता यावे याकरिता ग्राहकांना त्यांच्या मासिक जी काही शिल्लक असते
त्यासाठी पाच टक्के मिनिमम ड्यु पेमेंट भरण्याचा पर्याय देतात. जर तसे केले तर तुमची देय रक्कम जमा होते व त्यावर व्याज आणि लेट चार्ज फी लावली जाते.. त्यामुळे तुमचे कर्ज वाढते व क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो.
3- तुम्हाला गरज आहे तेवढेच क्रेडिट घ्यावे– क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणारे क्रेडिट हे शेवटी कर्जच असते व जेव्हा कर्ज घेणे आवश्यक असते तेव्हाच ते घ्यावे. नको त्या गोष्टींकरिता अनावश्यक कर्ज घेणे टाळणे फायद्याचे ठरते. जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करतात तेव्हा तुम्हाला कुठल्या गरजांसाठी कर्ज घ्यायचे आहे
याची मूल्यांकन करणे गरजेचे आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट घेतले तर तुमचं पैशांचे मॅनेजमेंट चुकते व क्रेडिट स्कोर कमी होतो. त्यामुळे आवश्यक तेथे व निवडकपणे क्रेडिट घेतले तर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहू शकतो.
4- आपत्कालीन परिस्थितीत पैसे तयार ठेवणे– तुम्हाला आर्थिक अडचण अचानकपणे उद्भवली तर अशा काळामध्ये पैशांची मदत ही खूप महत्त्वाची ठरते व अशावेळी क्रेडिट साठी अर्ज करणे हा एक पर्याय आहे. परंतु जर तुम्ही अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसा जमा करून ठेवला तर तुम्हाला कर्जाकरिता अर्ज करण्याची गरज भासत नाही.
5- सीयुआर अर्थात क्रेडिट युटिलायझेशन रेशो– जर तुम्ही नियमितपणे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमचा क्रेडिट युटीलायझेशन रेशो 30% किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा. म्हणजेच तुमचा क्रेडिट कार्डचा जो काही लिमिट आहे त्यापेक्षा 30% इतकाच खर्च करावा. 30% पेक्षा क्रेडिट युट्युलायझेशन जास्त झाले तर क्रेडिट स्कोर खराब होतो. त्यामुळे क्रेडिट युटीलायझेशन रेशोचा विचार करूनच क्रेडिट कार्डचा वापर करा.













