Commercial Tree Cultivation: ‘या’ झाडांची व्यावसायिक लागवड 8 ते 10 वर्षात देईल करोडोत नफा! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
commercial tree cultivation

Commercial Tree Cultivation:- सध्या पारंपारिक पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर कमी होत असून बागायती पिकांच्या लागवड खालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. परंतु तरीदेखील शेतीतून हवा तेवढा नफा मिळताना दिसत नाही.

अशा परिस्थितीत बदलत्या काळात शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळावे याकरिता मौल्यवान वृक्ष पिकांच्या लागवडीकडे बरेच शेतकरी आता वळताना दिसून येत आहेत. तसेच देशातील अनेक राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना अशा वृक्ष पिकांच्या लागवडीकरिता प्रोत्साहन देत आहेत.

सरकारच्या माध्यमातून अशा वृक्ष पिकांच्या लागवडीवर अनुदान देण्यात येत असून शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम देखील राबवले जात आहे. जर काही झाडांची लागवड केली तर त्यांना बाजारामध्ये प्रचंड मागणी असल्यामुळे  या माध्यमातून शेतकऱ्यांना करोड रुपयांचा नफा मिळवता येणे शक्य आहे.

लागवडीनंतर ही मौल्यवान वृक्ष आठ ते दहा वर्षात भरपूर पैसे शेतकऱ्यांना देऊ शकतात व शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून देखील हे महत्त्वाचे ठरू शकते. या लेखामध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या वृक्षांची माहिती घेणार आहोत ज्यांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन पैसे मिळण्याचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

 या वृक्षांची लागवड शेतकऱ्यांना देईल कोटीत नफा

1- मलबार कडूनिंब मलबार कडुनिंब हे बहुउद्देशीय व्यावसायिक वृक्ष पिक असून यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा वापर पॅकिंग बॉक्स, कृषी उपकरणे, पेंढा, छतावरील फळ्या तसेच कट्टा राम, पेन्सिल, फर्निचर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

मलबार कडुलिंबाच्या लाकडाचे वैशिष्ट्य म्हणजे याला वाळवी म्हणजेच दीमक लागत नाही. त्यामुळे या कडुनिंबाची लागवड अनेक वर्षांपर्यंत व्यवस्थित राहते. चार एकर जमिनीवर सुमारे पाच ते सहा हजार मलबार कडुलिंबाची रोपांची लागवड करता येते.

तसेच शेताच्या बांधांवर देखील 1000 ते 2000 झाडे लावता येणे शक्य आहे. एका वर्षामध्ये मलबार कडुलिंबाचे झाड सात ते आठ फूट उंचीपर्यंत वाढते व त्याची पूर्ण वाढ झालेले झाड सहा वर्षात काढणीसाठी तयार होते.

मलबार कडुलिंबाच्या लाकडाची किंमत 500 ते  550 रुपये प्रति क्विंटल इतकी आहे व या कडुलिंबाचे एक झाड साडेसहा ते सात हजार रुपयांना विकले जाते. साधारणपणे या कडुलिंबाची लागवड मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये केली जाते.

2- महोगनी वृक्ष हा एक अतिशय मौल्यवान वृक्ष असून याचे जवळजवळ सर्व भाग अनेक प्रकारच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी वापरले जातात. महोगणी वृक्षाचे लाकूड तसेच पान व बिया अशा सर्वच प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये चांगल्या भावात विकल्या जातात.

महोगणीच्या झाडापासून जे काही बियाणे मिळते ते 1000 रुपये किलो दराने बाजारात विकले जाते. महोगनीच्या लाकडाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यामुळे यावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नसल्यामुळे जहाज, मौल्यवान दागिने, फर्निचर,

, सजावटीच्या वस्तू आणि पुतळे बनवण्यासाठी याचे लाकूड वापरले जाते. तसेच यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे या झाडाची साल, फुले आणि बिया यांचा उपयोग टॉनिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. या झाडाची पाने आणि बिया यांच्या तेलापासून डासांपासून बचाव करणारी उत्पादने आणि कीटकनाशके तयार केली जातात.

महोगणी ची लागवड केल्यापासून दहा ते बारा वर्षांनी उत्पादनास तयार होते. एक एकर शेतीमध्ये जर लागवड केली तर अवघ्या बारा वर्षांनी शेतकरी करोडपती होऊ शकतो. महोगनी वृक्षाची लागवड उंच ठिकाणाशिवाय कोणत्याही ठिकाणी करता येते. महोगनी रोपांची लागवड जून आणि जुलै महिन्यात करता येते.

3- निलगिरी निलगिरी लागवडीचा खर्च खूप कमी असतो व नफा जास्त मिळतो. परंतु या झाडाच्या लागवडीपासून नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे आहे. कारण निलगिरीच्या लागवडीपासून दहा ते अकरा वर्षांनी साधारणपणे आपल्याला उत्पन्न मिळू शकते.

निलगिरीची झाडांचे चांगल्या वाढीसाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते. तुम्ही शेताच्या कडेने देखील निलगिरीची झाडे लावली तरी तुम्हाला काही वर्षांनी उत्तम नफा या माध्यमातून मिळू शकतो.

जर तुम्ही मोठ्या क्षेत्रावर निलगिरीची लागवड केली तर काही वर्षांनी कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न तुम्हाला मिळणे शक्य आहे. अगदी पडीक आणि ओसाड जमिनीवर देखील शेतकरी निलगिरीची लागवड करू शकतात.

4- चंदन चंदन हे एक फायदेशीर आणि मौल्यवान व्यावसायिक वृक्ष पीक असून याच्या उत्पादनाला देशात आणि परदेशात देखील खूप मागणी आहे. चंदनाच्या लागवडीला जितका पैसा खर्च होतो त्यापेक्षा काही पटीने या माध्यमातून नफा मिळतो.

चंदनाची रोपे कोणत्याही रोपवाटिकेतून साडेचारशे ते पाचशे रुपये प्रतिरोप या दराने खरेदी करता येतात. एक एकर क्षेत्रात सुमारे चारशे ते साडेचारशे रोपे लागवड करता येणे शक्य आहे. चंदनाच्या झाडाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये विशेष काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता नसते.

परंतु आठ ते दहा वर्षानंतर जेव्हा चंदनाची झाडे तयार व्हायला लागतात तेव्हा त्यांच्यापासून एक सुंदर सुगंध येऊ लागतो व यावेळी मात्र झाडांना संरक्षणाची गरज आहे. चंदन लागवडीकरिता सुमारे एक ते दीड लाख रुपये खर्च येतो आणि 60 ते 65 लाख रुपये नफा मिळू शकतो.

चंदनाचे एक झाड सुमारे चार ते पाच लाख रुपयांना बाजारात विकले जाते. म्हणजे तुम्ही जितक्या जास्त क्षेत्रावर चंदनाची लागवड करता तितके जास्त उत्पन्न तुम्हाला या माध्यमातून मिळेल. जर आपण चंदनाची किंमत पाहिली तर बाजारात 20 ते 25 हजार रुपये किलो पर्यंत असू शकते व परदेशात त्याची किंमत 25 ते 30 हजार रुपये प्रति किलो असल्याचे बोलले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe