DA Hike:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जो काही 42 टक्के महागाई भत्ता मिळत होता तो या चार टक्के वाढ केल्यामुळे 46% झाला असून तो एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेला आहे.
त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना याबाबतीत खूप मोठा दिलासा मिळाला. परंतु केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर आपण येणारा कालावधी पाहिला तर तो खूप महत्त्वाचा आणि चांगला ठरेल अशी शक्यता आहे. या कालावधीतच महागाई भत्त्यामध्ये पुढील वाढ होण्याची शक्यता असून नक्कीच या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.

महागाई भत्त्यातील पुढील वाढ ही साधारणपणे जानेवारी 2024 मध्ये होऊ शकते व यासाठी आवश्यक गणनेची आकडेवारी देखील समोर येऊ लागली असल्याने महागाई भत्तातील पुढील वाढ ही मोठी असू शकते अशी देखील शक्यता आहे.
महागाई भत्त्यात होईल पाच टक्क्यांची वाढ
महागाई भत्त्यामध्ये जानेवारी 2024 मध्ये जी काही पुढची वाढ होणारी आहे ती आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ ठरू शकते व ती पाच टक्क्यांपर्यंत असेल अशी शक्यता आहे. महागाई भत्ता सुधारणेमध्ये महत्त्वाच्या असलेल्या एआयसीपीआय निर्देशांका वरून सध्या तरी तशी शक्यता दिसून येत आहे.
जर याबाबतीत तज्ञांचे मत पाहिले तर सध्याच्या परिस्थितीनुसार महागाई भत्ता हा 51% पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे असे झाले तर पाच टक्क्यांची वाढ ही खूप उच्चांकी अशी वाढ ठरणार आहे. महागाई भत्ता सुधारणेमध्ये एआयसीपीआय निर्देशांक खूप महत्त्वाचा असून विविध क्षेत्रांमधून जी काही महागाईची आकडेवारी गोळा केली जाते त्यावरून महागाई भत्ता किती वाढवला पाहिजे हे कळते.
महागाई भत्ता 51 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे संकेत
जर आपण सातव्या वेतन आयोगाचा विचार केला तर एआयसीपीआय क्रमांक जुलै ते डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवतील. महागाई भत्ता हा 48.50 टक्क्यांवर पोहोचला असून तीन महिन्यांची आकडे अजून यायचे बाकी आहेत. यामध्ये आणखी 2.50 टक्क्यांची वाढ दिसू शकते असे देखील या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. परंतु ही परिस्थिती एआयसीपीआय निर्देशांकाच्या गणनेवर अवलंबून असेल.
परंतु जर आपण डीए कॅल्क्युलेटरचा विचार केला तर त्यानुसार हा महागाई भत्ता उर्वरित महिन्यांमध्ये 51% पर्यंत पोहोचेल असे संकेत आहेत. जेव्हा डिसेंबर 2023 चा एआयसीपीआय निर्देशांक येईल तेव्हाच महागाई भत्यात किती वाढ होईल हे अंतिमतः ठरणार आहे. सध्या हा निर्देशांक 137.5 अंकांवर आहे व यानुसार महागाई भत्त्याचा स्कोर हा 48.54 टक्क्यांवर पोहोचला आहे.