DA Hike News: केंद्र सरकारने नुकताच सातव्या वेतन आयोग अंतर्गत जे कर्मचारी वेतन घेतात अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली. अगोदर या कर्मचाऱ्यांना 42 टक्के या दराने महागाई भत्ता मिळत होता व आता त्यात चार टक्क्यांची वाढ केल्यामुळे तो 46% करण्यात आलेला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा हा देशातील 48.67 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यानुसार मिळणारा वाढीव पगार नोव्हेंबर महिन्यापासून मिळणार आहे. यासोबतच आता केंद्र सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार जे केंद्रीय कर्मचारी वेतन घेतात त्यांच्या बाबत देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला असून तो कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायद्याचा आहे.

या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारचे जे कर्मचारी पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेतात अशा कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याची घोषणा केली असून सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राईजेस मध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एक जुलै 2023 पासून वाढ करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना अगोदर 15 टक्के इतका महागाई भत्ता मिळत होता व तो आता या वाढीसह पंधरा वरून अठरा टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये देखील आता वाढ होणार आहे. यासंबंधीची घोषणा केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाने कार्यालयीन निवेदन जारी करून केली आहे.
महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर पासून वाढीव पगार देखील मिळणार आहे व यामध्ये जुलै ते नोव्हेंबर या कालावधीतील जी काही थकबाकी आहेत ती देखील मिळणार आहे.
46% महागाई भत्ता झाल्यानंतर किती फायदा होईल?
जर मूळ पगारांमध्ये ग्रेड वेतन जोडले तर तयार होणाऱ्या पगारांमध्ये महागाई भत्त्याचा दर हा गुणाकार केला जातो व या माध्यमातून जो निकाल येतो त्याला महागाई भत्ता असे म्हणतात. समजा मूळ वेतन जर दहा हजार रुपये आणि ग्रेड पे 1 हजार रुपये असले तर दोन्ही मिळून 11 हजार रुपये होतात.
या अकरा हजार रुपयांचे जर आपण 46 टक्के काढले तर ते 4 हजार साठ रुपये झाले. म्हणजे सर्व मिळून आता 16 हजार 60 रुपये होतात. जर आपण अगोदरच्या 42% महागाई भत्त्याचा विचार केला तर 11000 रुपयांचे बेचाळीस टक्के म्हणजे 4620 आणि सूत्रानुसार 11000+4620=15620 इतकी रक्कम होते म्हणजे चार टक्के महागाई भत्ता वाढल्यानंतर आता प्रत्येक महिन्याला 420 रुपयांचा वाढीव लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सीपीआय म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे काय?
महागाई भत्याच्या बाबतीत सीपीआय निर्देशांक खूप महत्त्वाचा असतो व याबाबत विचार केला तर भारतामध्ये दोन प्रकारची महागाई आहे. यामध्ये एक किरकोळ आणि दुसरी घाऊक महागाई होय. यातील किरकोळ चलनवाढीचा दर सामान्य ग्राहकांनी भरलेल्या किमतींवर आधारित असतो व यालाच ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे सीपीआय असे म्हणतात.