Diwali Bonus Update:- सध्या दिवाळी आणि दसरा हे भारतातील महत्त्वाचे सण असून ते आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. तसेच देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल देखील वाजला असून येणाऱ्या काही महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका देखील होऊ घातलेले आहेत.
जर आपण दिवाळी या सणाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर दिवाळीसाठी अनेक खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ दिला जातो. प्रत्येक क्षेत्रानुसार दिवाळी बोनस किती मिळेल हे ठरत असते. परंतु सणासुदीचे दिवस आणि होऊ घातलेल्या निवडणुका यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त देशातील इतर नागरिकांना देखील केंद्र सरकार काही योजनांच्या माध्यमातून वाढीव आर्थिक लाभ देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागरिकांना मिळू शकते बंपर गिफ्ट
सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर आणि 2024 च्या निवडणुकांपूर्वी देशातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असून विविध कारणांच्या माध्यमातून सरकार नागरिकांना बंपर गिफ्ट देण्याच्या तयारीत असून येणाऱ्या कालावधीत काही योजनांमधून जो काही आर्थिक नफा किंवा आर्थिक लाभ दिला जातो
त्यामध्ये सरकारकडून बदल केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट होऊ शकते तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढू शकतो. तसेच कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या घोषणा देखील केंद्र सरकारकडून केल्या जाण्याची शक्यता आहे.जर आपण महागाई भत्ता वाढीचा विचार केला तर बऱ्याच दिवसापासून याबाबतीतल्या चर्चा सुरू असून त्या बाबतीत देखील लवकरात लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
तसेच वरील जे काही मुद्दे आहेत ते देखील बऱ्याच काळापासून सरकारच्या विचारात असून बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचे निर्णय झाले असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव रकमेचा फायदा मिळेल अशी शक्यता आहे. तसेच देशातील इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या दृष्टीने देखील हिताचे काही मोठे निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते.
महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल अशी शक्यता असून जर यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता हा 42 टक्क्यांवरून 45 टक्के होईल व असे झाले तर या वाढीव महागाई भत्त्याचा लाभ हा एक जुलै 2023 पासून पगारात जोडला जाणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारकडून देशातील दहा कोटींपेक्षा जे काही भाडेकरू आहेत त्यांच्यासाठी आवास निधी योजना सुरू करण्यात येणार आहे. महिला वर्गाकरिता देखील येणाऱ्या काळामध्ये काही आकर्षक योजना सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना खूप चांगल्या पद्धतीची गिफ्ट मिळतील अशी अपेक्षा आहे.