ताबडतोब पूर्ण करा ‘हे’ काम नाहीतर बंद होऊ शकतो तुमचा यूपीआय आयडी! वाचा महत्त्वाची ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
banking news

सध्या डिजिटल व्यवहारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढले असून युपीआय आयडीच्या माध्यमातून सर्व प्रकारचे व्यवहार आता केले जातात. अगदी छोट्या प्रमाणातील जरी ट्रांजेक्शन असले तरी गुगल पे तसेच फोन पे व पेटीएम व इतर एप्लीकेशनच्या माध्यमातून पार पाडले जातात.

फोन पे आणि गुगल पे सारखे जे काही ॲप्स आहेत हे थर्ड पार्टी एप्लीकेशन असून यांचे नियमन प्रामुख्याने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून केले जाते. याच एमपीसीआयच्या माध्यमातून आता बँका आणि थर्ड पार्टी यांच्या बाबतीत एक महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेले असून  सर्व ग्राहकांसाठी देखील महत्त्वाचे आहेत.

 एनपीएससीने दिले बँका थर्ड पार्टी एप्लीकेशना महत्त्वाचे निर्देश

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्व बँका आणि फोन पे, गुगल पे सारख्या इतर थर्ड पार्टी ॲप आता जे काही यूपीआयआयडी ऍक्टिव्ह नसेल म्हणजेच निष्क्रिय असेल तर असे यूपीआय आयडी बंद करण्यात येणार आहेत. यासंदर्भात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने सर्व बँका आणि थर्ड पार्टी ॲप्सना अशा प्रकारचे आयडी ब्लॉक करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

म्हणजे ज्या यूपीआय आयडीच्या माध्यमातून एक वर्षाच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही असे यूपीआय आयडी ब्लॉक करण्यात येणार आहेत. याकरिता एनपीसीआयच्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे या कालावधीपर्यंत तुमचा युपआय आयडी ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय करणे गरजेचे आहे.

जर यूपीआय आयडी निष्क्रिय करण्या अगोदर बँक युजर्सना त्यासंबंधीचा ईमेल किंवा मेसेज पाठवण्यात येईल व त्या माध्यमातून सूचना देखील देण्यात येईल. एका वर्षापासून ज्या आयडीवरून कोणत्याही प्रकारचे क्रेडिट किंवा डेबिट व्यवहार झालेले नसतील ते आता बंद केले जाणार आहेत व नवीन वर्षापासून ग्राहकांना या आयडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा व्यवहार आता करता येणार नाही.

 एनपीसीआयच्या या निर्णयामुळे काय होणार फायदे?

1- चुकीचे व्यवहार टळतील एनपीसीआयच्या या नवीन मार्गदर्शक तत्वांमुळे आता चुकीच्या व्यक्तीकडे पैसे ट्रान्सफर केले जाणार नाहीत किंवा त्यांचा गैरवापर देखील होणार नाही इत्यादी बाबी सुनिश्चित केल्या जाणार आहेत. अशा प्रकारचे यूपीआय आयडी ओळखण्यासाठी बँक व थर्ड पार्टी एप्लीकेशन ला 31 डिसेंबर पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे.

2- मोबाईल नंबर बदलत असाल तर काळजी घ्या बरेच व्यक्ती आपला मोबाईल नंबर चेंज करतात आणि त्याच्याशी यूपीआयडी जो काही लिंक असतो तो इन ऍक्टिव्ह म्हणजेच निष्क्रिय करायला विसरून जातात. टेलिकॉम कंपन्यांच्या नियमानुसार जर अनेक दिवस मोबाईल नंबर बंद असल्यास तो दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीला दिला जातो. मात्र अशा एखाद्या नंबरशी जर एखादा जुना यूपीआय आयडी कनेक्ट असेल तर अशा परिस्थितीमध्ये चुकीचे व्यवहार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे नंबर बदलताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे व या निर्देशांचा फायदा यासंबंधी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe