FD Interest : सर्वसामान्यांमध्ये सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे एफडी. अशातच सध्या अनेक बँकांनी जास्तीत-जास्त ग्राहकांना या गुंतवणुकीकडे आकर्षित करण्यासाठी विशेष एफडी सुरू केल्या आहेत, परंतु या एफडी काही मर्यादित कालावधीसाठी आहेत. SBI, IDBI बँक, इंडियन बँक यांसह बँकांमध्ये कालमर्यादेसह विशेष एफडी उपलब्ध आहेत. बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँक यासारख्या बँकांनी उच्च व्याजदरासह नवीन कार्यकाल सुरू केले आहेत. दरम्यान, आज आम्ही येथे अशाच काही खास एफडींबद्दल बोलणार आहोत, ज्या त्यांच्या ग्राहकांना चांगला परतावा देत आहेत.
बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया सध्या त्यांच्या सर्वच एफडीवर चांगला परतावा देत आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने सर्वाधिक व्याजदरासह 400 दिवसांची नवीन एफडी (मान्सून डिपॉझिट) सादर केली आहे. बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 3 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देते. बँके 400 दिवसांच्या नवीन एफडीवर सर्वाधिक 7.25% व्याजदर ऑफर करत आहे.
एचडीएफसी बँक
बँकेने सामान्य नागरिकांसाठी 35 आणि 55 महिन्यांच्या कालावधीसह आणि अनुक्रमे 7.20 टक्के आणि 7.25 टक्के व्याजदरासह दोन मर्यादित कालावधीच्या निश्चित दर FD लाँच केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँक 7.60 आणि 7.75 टक्के ऑफर करते. HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, उच्च एफडी दर 35 महिन्यांसाठी 7.20% आणि 55 महिन्यांसाठी 7.25% वर उपलब्ध आहेत. आणि ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त लाभ मिळेल.
इतर बँकाच्या विशेष FD योजना
SBI ची विशेष FD अमृत कलशची मुदत १५ ऑगस्ट २०२३ रोजी संपणार आहे. अशातच IDBI बँकेची अमृत महोत्सव FD नावाची विशेष FD 444 दिवसांची आणि 375 दिवसांची मुदत 15 ऑगस्ट 2023 रोजी संपेल. इंडियन बँकेच्या विशेष एफडीला IND Super 400 Days म्हटले जात आहे. IND SUPREME 300 DAYS 31 ऑगस्ट 2023 रोजी संपेल. तर पंजाब आणि सिंध 400 दिवस आणि 601 दिवसांच्या कालावधीसाठी जास्त व्याजदर देतात आणि गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.