Fixed Deposit : ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर उत्कृष्ट परतावा दिला जात आहे. म्हणूनच बरेच लोकं येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशातच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (SSFB) ज्येष्ठ नागरिकांसाठी इतर बँकांपेक्षा चांगले व्यजदार देते. येथे ज्येष्ठ नागरिकांना 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 9.10% पर्यंत व्याजदर मिळत आहे, जो इतर कोणत्याही बँकेत दिला जात नाही. बँक ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के ते 9.10 टक्के व्याजदराने आणि सर्वसामान्यांना 4 टक्के ते 8.60 टक्के व्याजदराने 2 कोटी पेक्षा कमी मुदतीच्या परिपक्व होणाऱ्या FD वर देत आहे.
बँका आणि NBFC ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD ऑफर करत आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आता दोन ते तीन वर्षांत परिपक्व होणाऱ्या FD वर 9.10% व्याजदर मिळू शकतो. या कालावधीत सर्वसामान्य ग्राहकांना ८.६ टक्के व्याज मिळेल. बँक 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याजदर देते.
स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD वर 4.50% परतावा देत आहे. याव्यतिरिक्त, 15 दिवस ते 45 दिवस – 4.75%, 46 दिवस ते 90 दिवस – 5.00%, 91 दिवस ते 6 महिने – 5.50%, 6 महिन्यांहून अधिक ते 9 महिने – 6.00%, 9 महिन्यांपेक्षा जास्त ते 1 वर्षापेक्षा कमी पण- 6.50 टक्के परतावा देत आहे. याशिवाय सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 1 वर्षासाठी 7.35 टक्के, 1 वर्ष ते 15 महिन्यांसाठी 8.75 टक्के, 15 महिने ते 2 वर्षांसाठी 9.00 टक्के आणि 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 9.10 टक्के व्याजदर देत आहे.
बँकेचे म्हणणे आहे की, या बँकेतील ठेवींना डीआयसीजीसीचा आधार आहे. SFB ही 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 564 पेक्षा जास्त बँकिंग आउटलेट्स आणि 5085 कर्मचारी आणि 1.64 दशलक्ष ग्राहकांसह सर्वात वेगाने वाढणारी स्मॉल फायनान्स बँक आहे. SSFB बँक मुदत आणि बचत बँक ठेवींवर सर्वाधिक परतावा देत आहे.