पशु किसान कार्डसाठी कसा कराल अर्ज? किती मिळते शेतकऱ्यांना कर्ज? कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो लाभ? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
pashu kisan credit card

शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असून शेतीव्यतिरिक्त शेती सोबत शेतकरी अनेक प्रकारचे जोडधंदे करतात व या जोडधंद्यांना देखील प्रोत्साहन मिळावे याकरिता देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. यामध्ये काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत केली जाते तर काही योजनांच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांना करता येते.

जेणेकरून अशा योजनांच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे शेती किंवा जोडधंद्यातील उत्पादन दुप्पट व्हावे हा सरकारचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जाचा लाभ मिळावा व तोही कमीत कमी व्याजदरात मिळावा याकरिता शासनाने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली असून या धर्तीवरच पशु किसान क्रेडिट कार्ड देखील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुपालनाकरिता अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज मिळणे शक्य झालेले आहे.

शेतीच्या जोडधंद्यांचा विचार केला तर यामध्ये पशुपालन  व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन केले जाते. अशा शेतकऱ्यांकरिता पशु किसान क्रेडिट कार्ड हे खूप फायद्याचे ठरणारे आहे. त्याविषयीचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 पशु किसान कार्डच्या माध्यमातून कोणत्या पशुपालकांना कर्ज मिळते?

पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गाय व म्हैस पालन करणाऱ्या तसेच कुक्कुटपालन व मेंढी पालन, मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकते. शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरिता शेतकऱ्यांना कर्ज रुपात प्रोत्साहन रक्कम वितरित करण्यात येते.

या पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जास्तीत जास्त पशुपालन करणारे शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असं देखील आवाहन करण्यात येते. जर आपण पशुधन किसान क्रेडिट कार्डचे फायदे पाहिले तर ते अनेक पद्धतीचे आहेत. या कार्डच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जावर अनेक प्रकारच्या सवलती सरकारच्या माध्यमातून देण्यात येतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर या क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याजात सूट देण्यात येते व पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत जे काही क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना देण्यात येते

त्याचा वापर शेतकरी डेबिट कार्ड प्रमाणे करू शकतात. एवढेच नाही तर या पशु किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून पशुपालकांना दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिना गॅरंटी  देण्यात येते याकरिता केवळ सात टक्के एवढा व्याजदर आकारण्यात येतो. जर विहित मुदतीमध्ये कर्जाची परतफेड केली तर आणखी चार टक्क्यांची व्याज सवलत मिळते.

 पशुधन किसान क्रेडिट कार्ड करीता कसा करावा लागतो अर्ज?

तुम्हाला जर पशु किसान क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल किंवा या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील बँकेमध्ये जाणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्ड संबंधित एक अर्ज मिळतो व तो अर्ज व्यवस्थित भरून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून बँकेमध्ये जमा करणे गरजेचे आहे.

यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक तसेच इतर महत्त्वाची माहिती विचारलेली असते. ही माहिती तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही बँकेत तो अर्ज जमा कराल तेव्हा बँक तुम्हाला एक रिसिप्ट देईल. त्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला बँक बोलवेल किंवा तुमच्या घरी पशु किसान क्रेडिट कार्ड पाठवून देईल.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा अर्ज करण्याकरिता तुम्हाला काही कागदपत्रे देखील त्या अर्जासोबत जोडावी लागतात व नंतर ते बँकेमध्ये जमा करावे लागते. या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने अर्जदाराचे आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तसेच ओळखपत्र, प्राण्यांचे आरोग्य प्रमाणपत्र व पशुंचे विमा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.

 पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किती मिळते कर्ज?

पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जास्तीत जास्त तीन लाख रुपयाचे कर्ज मिळणे शक्य आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कामांकरिता वेगवेगळे कर्ज दिले जाते. उदाहरणच घ्यायचे झाले तर म्हशीकरिता साठ हजार रुपये तर गायींकरिता चाळीस हजार रुपये कर्ज मिळते व कुक्कुटपालनाकरिता सात हजार व शेळी तसेच मेंढीपालनाकरिता चार हजार रुपये कर्ज आपल्याला या माध्यमातून मिळू शकते व महत्त्वाचे म्हणजे या कर्जावर चार टक्के व्याजदर आकारण्यात येतो.

अशाप्रकारे तुम्ही अर्ज करून पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात व पशुपालन व्यवसायामध्ये वाढ करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe