HRA Hike Update:- केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून सध्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी याव्यतिरिक्त आणखी एक चांगली बातमी येणार असून येणारे 2024 या वर्षाची सुरुवात कर्मचाऱ्यांसाठी आनंदाच्या बातमीने होईल अशी एक शक्यता आहे.
सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जो काही 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर भत्त्यांमध्ये देखील तीन टक्क्यांची वाढ होणार आहे. या भत्त्यांमध्ये वाढ झाल्यामुळे पगारात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याविषयीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या घर भाडेभत्त्यात होणार वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व्यतिरिक्त घरभाडे भत्ता देखील दिला जातो. या वाढीबाबत केंद्र सरकारने नियम स्पष्ट केले आहेत. हा नियम केवळ महागाई भत्त्याशी संबंधित आहे. 2021 मध्ये एचआरए मध्ये सुधारणा झाली तेव्हा महागाई भत्ता 25% ओलांडला होता व जुलै 2021 मध्ये महागाई भत्त्याने 25 टक्क्यांची पातळी ओलांडताच घर भाडेभत्त्यात तीन टक्क्यांची वाढ झाली होती.
घर भाडेभत्त्याचे सध्याचे दर 27%, 18% आणि 9% इतके आहेत. आता परत एकदा महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहावी लागणार आहे. जरा नवीन वर्षामध्ये महागाई भत्त्यात वाढ होऊन तो 50 टक्क्यांवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. जर असे झाले तर घर भाडेभत्त्यामध्ये पुन्हा एकदा तीन टक्क्यांची सुधारणा केली जाईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या घर भाडेभत्त्यामध्ये सुधारणा ही महागाई भत्त्याच्या आधारावर केली जाते.
सध्या कर्मचाऱ्यांना मिळणारा घर भाडेभत्ता हा शहराच्या श्रेणीनुसार म्हणजेच 27, अठरा आणि नऊ टक्के इतका आहे. याकरिता सरकारच्या माध्यमातून 2015 यावर्षी निवेदन देण्यात आलेले होते. यामध्ये घर भाडेभत्त्याला महागाई भत्त्याशी जोडण्यात आले होते व त्याचे तीन दर ठरलेले होते. घर भाडे भत्त्यामध्ये पुढील सुधारणा ही तीन टक्क्यांची असणार असून सध्याचा घर भाडेभत्त्याचा जास्तीत जास्त दर हा 27% आहे.
जर घर भाडे भत्त्यामध्ये सुधारणा झाली तर हा कमाल दर 30% पर्यंत असेल व महागाई भत्ता जेव्हा 50 टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा हे होणे शक्य आहे. महागाई भत्ता जेव्हा 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा एक्स श्रेणीत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या जो काही 27% घर भाडे भत्ता मिळत आहे तो डीए 50% झाल्यास 30 टक्के होणार आहे. वाय श्रेणीतील शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 18 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत आणि झेड वर्गातील लोकांसाठी तो नऊ टक्क्यांवरील दहा टक्क्यांपर्यंत होईल.
घर भाडेभत्त्यात असलेल्या एक्स, वाय आणि झेड श्रेणी नेमक्या काय आहेत?
50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे एक्स या श्रेणीत येतात. या शहरांमध्ये राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27% एचआरए मिळतो तर वाय श्रेणीतील शहरांमध्ये 18% घर भाडेभत्ता सध्या मिळत आहे व झेड श्रेणीमध्ये नऊ टक्के इतका आहे.