चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले गेलेत का? तर नका करू काळजी! अशापद्धतीने मिळतील पैसे परत

Ajay Patil
Published:
upi payment

 सध्या डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येते. सध्या अगदी छोटे-मोठे व्यवहार किंवा अगदी छोटीशी रक्कम जरी द्यायची असेल तरी आपण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच फोनपे आणि  गुगल पे चा वापर मोठ्या प्रमाणावर करतो किंवा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे ट्रान्सफर करतो.

सहसा युपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार किंवा पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी असल्याने आता रोख रक्कम बाळगण्याऐवजी आता डिजिटल पद्धतीने पैशांच्या व्यवहाराला किंवा पैसे ट्रान्सफर करण्याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जात आहे.

परंतु यामध्ये बऱ्याचदा घाईगडबडीत किंवा काही चुकीने आपल्याला ज्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या ऐवजी दुसऱ्याच एखाद्या चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर केले जातात व खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

त्यामुळे चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर ते आपल्याला परत कसे मिळतील याबाबत अनेकांना माहिती नसते व मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडतो. परंतु यामध्ये जास्त काळजी करण्याची गरज नसून काही सोप्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तरी  तुम्हाला सहजतेने तुमचे पैसे परत मिळू शकतात.

 चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर झाले तरी या पद्धतीने मिळतील तुम्हाला परत

1- टोल फ्री क्रमांकचा करा वापर- जर तुमच्याकडून चुकीच्या नंबर वर यूपीआय पेमेंट केले गेले तर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर सेवा विभागाला कॉल करणे गरजेचे आहे किंवा तुम्ही ज्या युपीआय सेवेचा वापर केला असेल त्या युपीआय सेवा प्रदात्याशी देखील संपर्क साधू शकतात.

यामध्ये जर आपण आरबीआयनुसार पाहिले तर सर्वप्रथम तुमच्या झालेल्या या चुकीच्या व्यवहाराची माहिती सगळ्यात आधी तुमच्या पेमेंट सेवा प्रदात्याच्या ग्राहक सेवा विभागाला द्यावी लागेल.

तुम्ही जर यूपीआय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून चुकीच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित केले असतील तर तुम्ही 18001201740 या टोल फ्री नंबर वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकतात. या ठिकाणी तुम्हाला त्या पेमेंटच्या संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणे गरजेचे राहील.

2- एनपीसीआय पोर्टलवर तक्रार करा- समजा टोल फ्री क्रमांक वर किंवा काही मार्गाने तुम्ही प्रयत्न केला तरीदेखील तोडगा निघाला नाही तर तुम्ही एनपीसीआयच्या पोर्टलवर तक्रार करू शकता.

याकरिता तुम्हाला त्या पोर्टलवर अगोदर जावे लागेल आणि त्या ठिकाणी व्हॉट वि डू यावर क्लिक करावे लागेल व त्या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. या पर्यायामधून तुम्ही यूपीआय हा पर्याय निवडावा.

त्यानंतर कंप्लेंट सेक्शन मध्ये जावे आणि संपूर्ण व्यवहाराचा तपशील भरावा. यामध्ये तुम्हाला बँकेचे नाव तसेच फोन नंबर, ई-मेल आणि यूपी आयडी इत्यादी महत्त्वाची माहिती देणे गरजेचे आहे.

त्यानंतर इनकरेक्टली ट्रान्सफर टू द रॉंग यूपीआय ऍड्रेस हा पर्याय निवडावा लागेल व यासोबत काही वैध कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागतील.

3- तर बँकिंग लोकपालशी संपर्क करावा समजा तुम्ही तक्रार केली आहे व या तक्रारीचे 30 दिवस झाले तरी निराकरण झाले नाही तर तुम्ही बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकतात. मात्र यामध्ये जर नियम पाहिला तर तुम्हाला  चुकीच्या व्यवहाराच्या तीन दिवसांच्या आत तक्रार नोंदवणे गरजेचे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe