फॉलो करा ‘हे’ पर्याय आणि विसरा क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्याचे टेन्शन! असा करावा लागेल वापर

Ajay Patil
Published:
credit card

सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला क्रेडिट कार्डचा वापर दिसून येतो व हा वापर एका दृष्टिकोनातून बघितला तर खूप फायद्याचा देखील आहे. कार्डच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचा फायदा देखील होतो. जसे की, क्रेडिट कार्ड नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देते व त्यासोबतच कार्डचा वापर करून तुम्ही एखादी महाग वस्तू देखील खरेदी केली तरी सुलभ हप्त्यांमध्ये त्याचे रूपांतर करून पेमेंट करता येते.

हे व याशिवाय अनेक फायदे आपल्याला क्रेडिट कार्डच्या वापरामुळे मिळतात. परंतु क्रेडिट कार्डचा वापर करताना तो अत्यंत व्यावहारिक आणि जबाबदारी रीतीने करणे खूप गरजेचे आहे. कारण तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करता परंतु त्याचे बिल जर वेळेवर भरले नाही तर मात्र तुम्ही कर्जाच्या विळख्यात तर सापडतातच परंतु तुमचा सिबिल स्कोर खूप मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता यामुळे वाढते.

त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करता अगदी त्याच पद्धतीने तुम्ही त्याचे बिल देखील वेळेवर भरणे गरजेचे आहे. याकरिता तुम्ही काही पर्याय जर वापरले तर  कार्डचे बिल भरणे अगदी सोपे जाते व होणाऱ्या नुकसानी पासून वाचता येते.

 हे पर्याय वापरा आणि क्रेडिट कार्डचे बिल भरण्याचे टेन्शन पासून मुक्तता मिळवा

1- ऑटोमॅटिक पेमेंट सेट करणे क्रेडिट कार्डचे बिलचे पेमेंट करायचे असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक पेमेंट मोड सेट करून ठेवला तर खूप उत्तम ठरू शकते. हा पर्याय जर वापरला तर तो तुम्हाला तुमच्या बिलची पेमेंटची तारीख आठवणीत ठेवण्याची गरज नाही. याकरिता फक्त तुम्ही मिनिमम  ड्यू अमाऊंट अर्थात किमान देय रक्कम किंवा निश्चित रक्कम देण्यापेक्षा संपूर्ण बिल भरण्याचे रकमे करिता पेमेंट शेड्युल तयार करणे गरजेचे आहे. ऑटोमॅटिक बिल पेमेंट तुम्हाला लेट फी आणि व्याज लागण्यापासून वाचवू शकते.

2- व्यवहार केल्यानंतर लगेच कार्डचे बिल भरणे तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून कोणतीही खरेदी केली तर लगेच तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरणे गरजेचे आहे. ही सवय तुम्हाला रिवार्ड पॉईंट जमा करण्याला मदत तर करेलच परंतु तुमच्या बिलाची रक्कमही कमी करण्यास मदत करेल.

3- मोबाईल ॲप्लिकेशन आणि अलर्टचा वापर तुमची जी काही बँक असेल त्या बँकेचा बँकिंग मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करावा. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डच्या व्यवहारांना रियल टाईम मध्ये मॉनिटर करण्यास आणि पेमेंटचे बिल भरण्याची आठवण करून द्यायला मदत करते. या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनवरूनच खर्चांना ट्रॅक करणे किंवा पेमेंटची आठवण करून देते व ताबडतोब पेमेंट करण्याला मदत करते.

4- तुमच्या सोयीनुसार पेमेंट करण्याची तारीख निवडणे बँकेकडून क्रेडिट कार्ड बिलची पेमेंटची तारीख निवडण्याची परवानगी आपल्याला देण्यात येते. यामुळे तुम्हाला ज्याकडे महिन्याच्या कोणत्या तारखेला पैसे येतात त्या पद्धतीने बील पेमेंट ची तारीख निवडणे योग्य ठरते. म्हणजेच तुमचा पगार तर पाच तारखेला होत असेल तर तुम्ही यानुसार पाच तारीख निवडली तर तुमचे बिल वेळेवर भरले जाईल.

5- बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय ही एक उपयुक्त सुविधा असून त्या माध्यमातून तुम्हाला कमी वार्षिक टक्केवारी दर असलेले जे काही क्रेडिट कार्ड आहे त्यावर उच्च व्याज असलेल्या क्रेडिट कार्डचे कर्ज एकत्रित करता येते. समजा तुमच्याकडे जर थकबाकी असलेले एकापेक्षा अधिक कार्ड असतील

तर तुम्ही त्या कार्डवरील शिल्लक एका कार्डवर ट्रान्सफर करू शकता. ज्यामुळे पेमेंट मॅनेज करण्यासाठी आणि व्याज वाचवण्याकरिता कमी वार्षिक टक्केवारी दर देते. परंतु यामध्ये खर्च टाळण्याकरिता तुम्ही यासाठी लागणारे शुल्क तपासणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe