Recurring Deposit Scheme:- प्रत्येक जण कष्टाने कमावलेल्या पैशांची बचत करून त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक पर्यायांचा शोध घेत असतात.
या पर्यायांमध्ये ज्या ठिकाणहून खात्रीशीर आणि चांगला परतावा मिळेल व गुंतवणूक देखील सुरक्षित राहील योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. तसे पाहिले गेले तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत.
यामध्ये सरकारच्या योजना देखील आहेत तसेच बँकेच्या मुदत ठेव योजनांना देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार पसंती देतात. तसेच बरेच जण म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये देखील गुंतवणूक करतात.
परंतु या व्यतिरिक्त जर आपण आवर्ती ठेव म्हणजेच आरडीमध्ये जर गुंतवणूक केली तर हा एक चांगला परतावा मिळवून देण्यासाठी उत्तम असा गुंतवणुकीसाठीचा पर्याय आहे.
आरडी आणि एसआयपी मधील गुंतवणुकीची तुलना
कमीत कमी गुंतवणुकीत चांगले व्याज मिळवायचे असेल तर बरेच जण एसआयपी आणि आरडी यासारख्या पर्यायांचा वापर करतात. तर आपण या दोनही पर्यायांचा तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर या दोन्हींमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम जमा करून व्याजाचा फायदा मिळवू शकतात.
परंतु यामध्ये एसआयपीचा विचार केला तर ही हमी परतावा असलेली योजना नाही. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे ती बाजाराशी कनेक्ट असलेली योजना आहे. एसआयपीमध्ये तुम्हाला सरासरी 12 टक्क्यांचा परतावा मिळतो असे साधारणपणे मानले जाते.
परंतु बरेच गुंतवणूकदार यामध्ये जोखीम असल्यामुळे हा पर्याय अवलंबत नाही व यामध्ये सुरक्षित गुंतवणूक पर्यायाच्या शोधात ते असतात. त्यामुळे एसआयपीच्या तुलनेत आवर्ती ठेव म्हणजेच आरडी हा एक चांगला पर्याय आहे.
आवर्ती ठेव म्हणजेच आरडीची सुविधा ही बँक आणि पोस्ट ऑफिस मधून तुम्ही घेऊ शकतात. बँकांमध्ये जर तुम्हाला आरडी घ्यायचे असेल तर ती एक ते दहा वर्षांसाठी घेता येते तर पोस्ट ऑफिसमध्ये ती पाच वर्षांसाठी घेता येते.
यामध्ये बँकांच्या माध्यमातून देखील आरडीवर कमी वेळेत चांगला व्याजाचा फायदा मिळतो. म्हणून या लेखांमध्ये आपण एक ते पाच वर्षांसाठी जर तुम्ही आरडी केली तर किती वर्षाच्या आरडीवर कोणती बँक किती व्याज देते? याबद्दलची माहिती बघू.
एक वर्षाच्या आरडीवर कोणती बँक किती व्याज देते?
स्टेट बँक ऑफ इंडिया 6.80%, एचडीएफसी बँक 6.60%, आयसीआयसीआय बँक 6.70% आणि कोटक महिंद्रा बँक 7.10% इतके व्याज देते.
दोन वर्षाच्या आरडीवर कोणती बँक किती व्याज देते?
दोन वर्षाच्या आरडीवर स्टेट बँक ऑफ इंडिया 7%, एचडीएफसी बँक सात टक्के, आयसीआयसीआय बँक 7.10% तर कोटक महिंद्रा बँक 7.15% इतके व्याज देते.
तीन वर्षाच्या आरडीवर कोणती बँक किती व्याज देते?
तीन वर्षाच्या आरडीवर स्टेट बँक ऑफ इंडिया 6.50%, एचडीएफसी बँक सात टक्के तर आयसीआयसीआय बँक सात टक्के व कोटक महिंद्रा बँक ही 7% इतके व्याज देते.
पाच वर्षाच्या आरडीवर कोणती बँक किती व्याज देते?
पाच वर्षाच्या आरडीवर स्टेट बँक ऑफ इंडिया 6.50%, एचडीएफसी बँक सात टक्के, आयसीआयसीआय बँक सात टक्के, कोटक महिंद्रा बँक 6.20% तर पोस्ट ऑफिस 6.70% इतके व्याज देते.
यावरून आपल्याला दिसून येते की तुम्ही जर एक किंवा दोन वर्षांसाठी आरडी केली तर कोटक महिंद्रा बँकेमध्ये तुम्हाला व्याजाचा जास्त फायदा मिळतो.
तसेच तीन वर्षाच्या आरडीवर साधारणपणे बऱ्याच बँक सारखेच दराने व्याज देतात. पाच वर्षांच्या आरडीसाठी तुम्हाला एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय बँकेचा पर्याय चांगला ठरताना आपल्याला यावरून दिसून येतो.