Investment Tips : 416 रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा ! जाणून घ्या महत्वाची योजना…

गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर विविध बँकांच्या मुदत ठेव योजना व पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाते.त्याशिवाय काही सरकारच्या योजना देखील गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाचे असून या योजनांमध्ये गुंतवणुकीत सातत्य ठेवले तर काही वर्षांच्या कालावधीत कोट्यावधींचा निधी जमा करता येणे शक्य होते.

Ahmednagarlive24
Published:

Investment Tips : गुंतवणूक ही भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असल्याने प्रत्येक जण नोकरी किंवा व्यवसाय करून जे पैसे कमवतात त्या पैशांची बचत करून गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक करताना मात्र केलेल्या गुंतवणुकीची सुरक्षितता व त्या माध्यमातून मिळणारा परतावा या गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच गुंतवणूक पर्याय निवडले जातात.

गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर विविध बँकांच्या मुदत ठेव योजना व पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाते.त्याशिवाय काही सरकारच्या योजना देखील गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाचे असून या योजनांमध्ये गुंतवणुकीत सातत्य ठेवले तर काही वर्षांच्या कालावधीत कोट्यावधींचा निधी जमा करता येणे शक्य होते.

दररोज 416 जमा केले तरी करोडपती

याच पद्धतीने जर सरकारची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना पाहिली तर ती देखील अशीच एक फायद्याची योजना असून या योजनेत ग्राहकांना खूप चांगल्या पद्धतीचा व्याजदर मिळतो. या योजनेमध्ये जर तुम्ही दररोज 416 जमा केले तरी काही वर्षात तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

पीपीएफ योजनेचे स्वरूप?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना खूप फायदेशीर योजना असून यामध्ये गुंतवणूक केल्यावर 7.1% व्याजदर मिळतो व कमीत कमी पाचशे रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करू शकता. तसेच जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक या योजनेत तुम्हाला करता येते. पीपीएफ योजनेचा परिपक्वता कालावधी म्हणजेच योजनेचा कालावधी पंधरा वर्षाचा आहे व त्यामध्ये तुम्ही परत पाच वर्षाचा कालावधी दोनदा वाढवू शकतात.

416 रुपये तुम्हाला कसे बनवतील करोडपती?
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जर तुम्ही दररोज 416 रूपांची बचत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 12 हजार पाचशे रुपये जमा करायला मदत करते व अशा पद्धतीने वर्षाला तुमचे 1.5 लाख रुपये जमा होतात. जर तुम्ही पीपीएफ योजनेमध्ये पंचवीस वर्षांकरिता गुंतवणूक केली तर तुम्हाला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या माध्यमातून मिळेल.

पंचवीस वर्षानंतर एक कोटी…

या योजनेमध्ये 7.1% व्याजदर लागू होतो व त्यानुसार पंचवीस वर्षानंतर तुम्हाला साधारणपणे एक कोटी तीन लाख आठ हजार पंधरा रुपये मिळतात. एवढेच नाहीतर या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कलम 80C च्या माध्यमातून कर लागू होत नाही म्हणजेच करात सवलत मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेच्या परिपक्वतेनंतर तुम्हाला जी काही रक्कम मिळते ती देखील करमुक्त असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe