LIC New Scheme: तुमच्या मुलांचे भविष्य करा आर्थिक दृष्ट्या सुरक्षित! एलआयसीने आणली मुलांसाठी नवीन योजना

Ajay Patil
Published:
lic scheme

LIC New Scheme:- एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या आकर्षक विमा योजना राबविण्यात येतात. जर आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला तर बहुतेक गुंतवणूकदाराकडून एलआयसीच्या आकर्षक अशा वेगवेगळ्या प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते.

एलआयसीच्या गुंतवणुकीतून परतावा तर मिळतो परंतु विम्याचे कवच देखील मिळत असल्याने बहुतेक गुंतवणूकदार एलआयसी ला प्राधान्य देतात. याच पद्धतीने एलआयसीच्या माध्यमातून नुकतीच मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण योजना आणण्यात आली

असून या योजनेचे नाव आहे अमृतबाल योजना ही होय. ही एक वैयक्तिक बचत जीवन विमा योजना असून ती खास मुलांचे उच्च शिक्षण व इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खास डिझाईन करण्यात आलेली आहे.

एलआयसीच्या या प्लॅनला प्लॅन 874 असे नाव देण्यात आले असून जे खास मुलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजेच एक प्रकारे पाहिले तर ही एक चाईल्ड इन्शुरन्स पॉलिसी आहे. चला तर मग या लेखामध्ये आपण एलआयसीच्या या नवीन पॉलिसी बद्दल माहिती घेणार आहोत.

 एलआयसी अमृतबल पॉलिसी

 एलआयसी ने 30 दिवस ते कमाल 13 वर्षे वयोगटातील मुलांसाठी खास डिझाईन केलेली नवीन विमा पॉलिसी लॉन्च केली असून तुम्ही जर ही वैयक्तिक बचत जीवन विमा योजना ऑनलाईन खरेदी केली तर त्यावर तुम्हाला सवलत देखील मिळणार आहे.

एलआयसी अमृत बाल पॉलिसी मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा फंड उपलब्ध करून देण्यासाठी खास करून तयार करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर ही पॉलिसी खरेदी करायची असेल तर तुम्ही 17 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकणार आहात.

या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही पॉलिसी प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या समाप्तीपासून पॉलिसीची मुदत संपेपर्यंत प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी 80 रुपये प्रति हजार या दराडे हमी जोडणीद्वारे विमा रक्कम ऑफर करते.

 या पॉलिसीमध्ये पेमेंटचे पर्याय कसे आहेत?

 एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये पाच वर्ष, सहा वर्ष किंवा सात वर्षाच्या शॉर्ट प्रीमियम पेमेंट उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त प्रीमियम पेमेंट टर्म दहा वर्ष असून तुम्ही सिंगल प्रीमियम पेमेंट पर्याय देखील निवडू शकता.

या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला कमीत कमी दोन लाख रुपयांचा विमा घ्यावा लागेल. तसेच तुम्ही तुम्हाला गरज असल्यास मनी बॅक प्लॅन प्रमाणे दहाव्या किंवा पंधराव्या वर्षी मॅच्युरिटी सेटलमेंट घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe