LIC New Jeevan Shanti Scheme : LICच्या ‘या’ पॉलिसीत एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर मिळावा लाभ !

Sonali Shelar
Published:
LIC New Jeevan Shanti Scheme

LIC New Jeevan Shanti Scheme : वयाची 40-50 वर्षे ओलांडल्यानंतर, सर्वांनाच आपल्या भविष्याची चिंता वाटू लागते. म्हणूनच आतापासूनच भविष्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे ठरते. अशातच प्रत्येक नोकरदार व्यक्तीने शक्य तितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे आणि योग्य गुंतवणूक केली पाहिजे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत. भविष्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची नवीन जीवन शांती सेवानिवृत्ती योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

पेन्शनसाठी खास तयार करण्यात आलेल्या एलआयसीच्या या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फक्त एकदाच पैसे जमा करावे लागतात, आणि आयुष्यभर याचा लाभ येतो, निवृत्तीनंतर ही रक्कम तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळेल. एलआयसीच्या या नवीन जीवन शांती योजनेचा प्लॅन क्रमांक ८५८ आहे.

अनेक वेळा निवृत्तीपूर्वी नोकरी सोडावी लागते, अशावेळी उत्पन्नाचा स्रोत संपतो. ही समस्या लक्षात घेऊन एलआयसीची नवीन जीवन शांती योजना तयार करण्यात आली आहे. ही वार्षिक योजना आहे. यामध्ये तुम्ही गुंतवणुकीच्या आधारे तुमची पेन्शन ठरवू शकता. तुम्हाला किमान एक वर्षाच्या नियमित अंतरानंतर दर महिन्याला पेन्शन मिळू लागते.

ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे, याचा अर्थ तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला 1 ते 12 वर्षांच्या कालावधीत पेन्शन मिळू शकते. योजनेत 10 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 11000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन मिळू शकते. या योजनेत 6.81 ते 14.62% व्याज उपलब्ध आहे. यामध्ये अविवाहित आणि संयुक्त अशा दोन्हींना पेन्शन मिळण्याची सेवा मिळते.

30 ते 79 वर्षे वयोगटातील कोणीही LIC च्या योजनेत गुंतवणूक करू शकतो. विशेष बाब म्हणजे ही योजना तुम्ही कधीही सरेंडर करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या खात्यात जमा केलेले पैसे नॉमिनीकडे जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe