Low Investment Business Idea: कमी खर्चात लाखात नफा कमवायचा असेल तर करा हे व्यवसाय! वाचा माहिती

Published on -

Low Investment Business Idea:- नोकरीपेक्षा जर छोटा मोठा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय जर केला तर माणूस आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण राहतेच हे मात्र निश्चित असते. नोकरीच्या तुलनेमध्ये व्यवसायामध्ये जोखीम आणि अनिश्चितता जास्त असते हे खरे परंतु जर व्यवस्थित नियोजन करून आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यवसायाची उभारणी आणि आखणी केली तर व्यवसायाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पैसा कमावता येणे शक्य आहे.

व्यवसाय सुरू करताना फक्त काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते जसे की तुम्ही सुरुवात करत असलेल्या व्यवसायाची मागणी नेमकी कशा पद्धतीची आहे हे अगोदर पाहणे गरजेचे असते त्यानुसारच व्यवसायाची सुरुवात फायद्याचे ठरते. याच मुद्याला धरून आपण या लेखांमध्ये काही व्यवसायांची यादी पाहणार आहोत चे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची मागणी बाजारपेठेत कायम असते.

 कमी भांडवलातील काही महत्वाचे व्यवसाय

1- टीशर्ट प्रिंटिंग व्यवसाय जर आपण कॉलेजमधील मुले मुलींचा विचार केला तर बरेच जण टी-शर्ट घालण्याला पसंदी देता ज्याच्या मागे त्यांचे नाव लिहिलेले असते. तसेच एखाद्या कंपनीने एखादा कार्यक्रम आयोजित केला असेल तर त्या कंपनीचा लोगो किंवा नाव त्यासाठी शर्टमध्ये दिसते ज्यावर कंपनीचे नाव लिहिलेले असते. टी-शर्ट प्रिंटिंग हा व्यवसाय खूप चांगला व्यवसाय असून मोठ्या शहरांमध्ये हा व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो.

त्यानुसार तुम्ही त्यांच्या टी-शर्टवर डिझाईन बनवण्याचे काम करू शकतात. हा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्ही एखादे दुकान भाड्याने घेऊन आणि त्यामध्ये टी-शर्ट प्रिंटिंग मशीन विकत घेऊन सुरुवात करू शकता. यामध्ये बऱ्याचदा ग्राहक स्वतःच टी-शर्ट घेऊन येतात व ते फक्त प्रिंट करण्यासाठी देतात.

त्यावर तुम्हाला फक्त त्यांचे आवडते डिझाईन प्रिंट करायचे असते. यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला भरपूर संख्येमध्ये टी-शर्ट प्रिंट करण्याच्या ऑर्डर देखील मिळते. जेव्हा मोठे ऑर्डर मिळते यामध्ये तुम्हाला टी-शर्ट विकत घ्यावे लागतात व ते प्रिंट करून ग्राहकांना द्यायचे असतात. त्यामुळे तुम्हाला टी-शर्ट विकणारे व्यापारी आणि कंपन्या यांच्याशी संपर्कात राहणे गरजेचे आहे. तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारणपणे 20 ते 25 हजार रुपये भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो.

How to Start a T-shirt Printing Business | Ownr

2- शेळीपालन व्यवसाय शेती संबंधित असलेल्या जोडधंद्यांपैकी शेळीपालन हा एक खूप महत्त्वपूर्ण व्यवसाय असून अनेक बेरोजगार तरुण आता या व्यवसायाकडे वळत आहेत. शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला कोणत्या जातीची शेळी फायद्याची ठरेल त्या दृष्टिकोनातून खरेदी करणे गरजेचे आहे. तुम्हाला किती शेळ्या खरेदी करायचे आहेत व त्यांना पुरेशी जागा तुमच्याकडे आहे का या दोन-तीन गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते.

तसेच परिसरानुसार शेळीच्या किमतीत देखील बदल होत असतो. शेळी पालन व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला त्याकरता लागणारे भांडवल आणि त्यातून मिळणारे अपेक्षित उत्पन्न याचा अंदाज बांधणे गरजेचे आहे. नेमके तुम्हाला कोणत्या उद्देशाने शेळीपालन व्यवसाय करायचा आहे त्या दृष्टिकोनातून शेळ्या खरेदी करणे गरजेचे आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी खर्चात उत्तम नफा मिळतो. या व्यवसायात जोखीम तशी कमी असते.

फक्त शेळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला नियोजन करणे गरजेचे असते याकरिता तुम्ही वेळोवेळी लसीकरण करणे देखील महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही शेळ्यांचा विचार केला तर शेळ्यांना चारण्यासाठी तुम्ही मोकळ्या जागेत एखाद्या कुरणात नेऊ शकतात व त्यामुळे चाऱ्याचा खर्च देखील कमी होतो. मांस उत्पादनाच्या उद्दिष्ट ठेवून जर शेळीपालन व्यवसाय केला तर तो फायद्याचा ठरतो.

Goat farming a profitable business for youth: Experts : The Tribune India

3- वेडिंग प्लॅनर( लग्न समारंभाचे नियोजन)- लग्नकार्य हा प्रत्येकाच्या घरात येणारा व आयुष्यातील एक खास व अविस्मरणीय असा प्रसंग असतो. आयुष्यात एकदाच येणारा हा प्रसंग आनंदात आणि खूप व्यवस्थित पार पडावा ही इच्छा प्रत्येकाची असते. यामध्ये घरातील येणाऱ्या पाहुण्यांची मेजवानी व लग्नातील जेवणाचा मेनू इत्यादी पासून तर लग्नातील सजावट या गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते.

म्हणूनच बऱ्याच व्यक्ती विवाहाचे नियोजन तसेच लग्न समारंभाची संपूर्ण जबाबदारी एखाद्या व्यक्तीकडे दिली जाते व त्यालाच आपण लग्न नियोजक अर्थात वेडिंग प्लॅनर असे म्हणतो. यामध्ये लग्नाचे संपूर्ण प्लान तसेच समारंभ कसा होणार किंवा सजावटीसाठी वापरण्यात येणारी फुले, लग्नात जेवणाचा मेनू तर डीजेवर नेमकी कोणती गाणी वाजवली जातील इत्यादी सर्व प्लॅनिंग वेडिंग प्लॅनर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या साह्याने पार पडली जाते.

वेडिंग प्लॅनर हा ज्या घरी लग्न आहेत त्या लोकांची इच्छा विचारूनच त्या पद्धतीने सगळी लग्नाची प्लॅनिंग करतो. वेडिंग प्लॅनर होण्याकरिता तुमच्याकडे इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केलेला असणे खूप गरजेचे आहे तसेच तुमच्याकडे सर्जनशीलतेचा दर्जा असावा व त्यांच्याकडे सर्जनशीलता नाही त्यांच्यासाठी हा व्यवसाय नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एखादे छोटे ऑफिस उघडणे गरजेचे आहे. ऑफिस उघडताना ज्या ठिकाणी लग्न पत्रिका छापायची दुकाने तसेच लग्न मंडपाची तंबू वगैरे चे दुकाने असतील अशा ठिकाणी उघडावे.

तसेच महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय एका माणसाचे काम नसून या ठिकाणी एका भरभक्कम आणि व्यवस्थित टीमची आवश्यकता भासते. पुढे हा व्यवसाय चांगला सुरू राहावा याकरता तुमच्याकडे उत्तम टीम असणे गरजेचे आहे. तसेच हा व्यवसाय सुरू करण्याआधी तुमच्याकडे जीएसटी नोंदणी तसेच दुकानाचे नाव नोंदणी करणे व व्यापार इत्यादी बद्दलचे परवाने देखील आवश्यक असतात. व्यवसाय साधारणपणे तुम्ही सहा ते सात लाख रुपये भांडवलात  सुरू करू शकतात.

How to Start a Wedding Planning Business

4- सौर पॅनल व्यवसाय सौर पॅनल व्यवसाय हा आजच्या काळातील खूप महत्त्वाचा व्यवसाय असून वाढत्या ऊर्जेची गरज लक्षात घेता सरकार अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे व या दृष्टिकोनातून सौर पॅनल व्यवसायाला खूप महत्त्व आहे. सौर पॅनल व्यवसायाचा विचार केला तर यामध्ये तुम्ही  एखाद्या सोलर पॅनल कंपनीचे फ्रॅंचाईजी घेऊन तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सरकारी किंवा खाजगी कंपनीची देखील फ्रेंचाईजी घेऊ शकतात..

फ्रॅंचायजी करिता तुम्हाला नोंदणी करणे गरजेचे असते व यासाठी तुम्हाला निश्चित काही शुल्क भरावे लागते.  महत्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे पुरेशी मोकळी जागा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सोलर प्लांट बसवू शकतात व या माध्यमातून निर्माण होणारी वीज विकून तुम्ही पैसे मिळवू शकता. या व्यवसायाकरिता लागणाऱ्या खर्चाचा विचार केला तर सोलर पॅनल कंपनीची फ्रेंचायजी घेण्यासाठी आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च येतो.

तुम्हाला सोलर प्लांट बसवायचा असेल तर 70 ते 80 हजार रुपये प्रति किलोवॅट प्रमाणे खर्च येतो. तुम्ही या व्यवसायावर आधारित असलेले अनेक उत्पादने जसे की सोलर बल्ब, सोलर पंप तसेच सोलर वॉटर हीटर, सोलर मोबाईल चार्जर इत्यादी उत्पादने विकून देखील चांगली कमाई करू शकतात.

Start a Solar Business in India - A Complete Guide - SolarClap

5- किराणा दुकान जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर किराणा दुकान हा व्यवसाय खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे. किराणा दुकान उघडून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात. किराणा दुकान उघडायचे असेल तर तुमच्या दुकानासाठी योग्य जागेची निवड यासाठी खूप महत्त्वाची ठरते. तुम्हाला ज्या भागांमध्ये किराणा दुकान उघडायचे आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात किराणा दुकान अस्तित्वात नाहीत याची खात्री करणे गरजेचे आहे.

किराणा दुकान उघडताना ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे किंवा लोकांची वर्दळ किंवा गर्दी असते अशा ठिकाणी उघडणे गरजेचे असते. किराणा दुकान उघडण्यासाठी तुम्हाला साधारणपणे दुकानाच्या स्वरूपावरून कि ती खर्च येईल हे ठरते. सामान्यपणे तुम्हाला किराणा दुकान उघडायचे असेल तर दोन लाख ते तीन लाख रुपये खर्च येतो.

जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पुरेसे भांडवल नसेल तर तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून लहान किराणा दुकान उडून देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. किराणा दुकानांमध्ये तुम्ही मैदा पासून, तांदूळ तसेच डाळी, साखर, मसाले, नमकीन तसेच बिस्किटे इत्यादी वस्तू विक्रीसाठी ठेवू शकता तसेच कोल्ड्रिंक्स वगैरे देखील ठेवू शकतात. दूध, ब्रेड तसेच फिनाईल व साबण देखील ठेवू शकता.

Profits in Grocery Store Business (Cost to Start) | Idea2MakeMoney

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News