Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

Money Saving Tips: कितीही पैसा कमावला तरी पैसा हातात टिकतच नाही? खर्च नियंत्रणात आणणे कठीण होत आहे? वापरा या टिप्स,होईल फायदा

Friday, January 26, 2024, 1:15 PM by Ajay Patil

Money Saving Tips:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव असेल की आपण पैसा कमवतो आणि बऱ्याचदा त्या पैशामधून आपण आवश्यक खर्च भागवून बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही केल्या पैसा हा टिकतच नाही म्हणजे त्याची बचत होतच नाही व सर्व पैसा हा खर्च होत असतो.

पुढची पगाराची तारीख येत नाही तोपर्यंत आपल्या खिशात एक रुपया देखील राहत नाही अशी देखील परिस्थिती निर्माण होते. बऱ्याच जणांना तर महिन्याच्या शेवटी शेवटी काही आवश्यक गोष्टींसाठी उसनवार पैसे घेण्याची वेळ देखील आल्याचे आपण बघितले असेल. त्यामुळे जर विचार केला तर असे का होत असेल?

प्रयत्न करून देखील पैसा का टिकत नसेल? हे प्रश्न बऱ्याचदा आपल्या मनात येतात. परंतु या गोष्टीचे उत्तर हे आपल्याशी संबंधित आहे व पैसा खर्च करणारे आपणच असल्याने  काही बारीक सारीक गोष्टींवर लक्ष दिले तर नक्कीच आपण जे काही कमवतो त्यातून नक्कीच आपण बचत करू शकतो. त्यामुळे या लेखात आपण कोणत्या गोष्टी अशा आहेत की त्या जर तुम्ही काळजीपूर्वक पाळल्या तर तुम्ही पैसे वाचवू शकतात, त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.

 पैसे वाचवण्यासाठी या गोष्टी ठरतील फायद्याच्या

1- यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करणे ठरेल फायद्याचे– आपल्यापैकी बरेच जणांना अनुभव आला असेल की जर आपल्या खिशामध्ये रोकड असली म्हणजेच रोख पैसे असले तर आपण खर्च करताना बिनधास्तपणे खर्च करतो म्हणजे करत असलेल्या खर्चाबाबत आपल्याला नेमका अंदाज राहत नाही.

पैसे संपल्यानंतर पुन्हा एटीएम ने पैसे काढण्यावर भर देऊन परत खर्च केले जातात. परंतु या तुलनेमध्ये जर आपण यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार म्हणजेच पैसे खर्च केले तर कमीत कमी आपण दिवसभरामध्ये किती वेळा पैसे खर्च केले याची माहिती आपल्याला मिळत असते.

जर आपण विश्वासाने यूपीआय व्यवहारांच्या माध्यमातून खर्च केला तर नक्कीच आपले पैसे वाचू शकतात या गोष्टीबद्दल तुम्ही विश्वास ठेवला तर नक्की तुमचे पैसे वाचतील..

जेव्हा तुमचा महिना संपेल तेव्हा तुम्ही यूपीएच्या माध्यमातून जो पैसा खर्च केला असेल तो नेमका कुठे केला आहे? याचा अंदाज घेणे गरजेचे आहे व त्यामुळे तुम्हाला कळून येईल की तुम्ही कोणत्या ठिकाणी अनावश्यक खर्च केला व ज्या गोष्टींना अनावश्यक खर्च केला असेल तो तुम्हाला टाळता येऊ शकतो.

2- नको त्या गोष्टींवरचा खर्च टाळा– बरेच जणांना काही सुट्टी वगैरे राहिली तर कुटुंबाच्या सोबत फिरायला जातात व बरेचदा फिरायला जात असताना एखाद्या मॉलमध्ये जाऊन किंवा बाजारपेठेमध्ये जाऊन अनेक नको त्या गोष्टी खरेदी केल्या जातात. यामध्ये लहान मुलांच्या खेळणी असो किंवा सौंदर्यप्रसाधने,

घरात लागणाऱ्या काही वस्तू आपण खरेदी करतो. बऱ्याचदा अशा वस्तू आपल्या घरात आधीच असतात व तरीदेखील आपण नवीन त्या परत खरेदी करतो. यामुळे देखील बरेच पैसा खर्च होत असतो व आपल्याला तो कळत देखील नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे.

3- एकूण उत्पन्नाचे नियोजन असे करा– तुम्ही महिन्याला तुमचे जे काही एकूण उत्पन्न आहे त्याची 25% पैसे तुम्ही एका वेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर करावेत व त्यातून तुमचे जे काही गुंतवणुकीच्या हप्ते असतील ते देण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

म्हणजे यामध्ये तुमचे नियमित बचत खाते ज्या बँकेत आहे त्याच बँकेत तुम्ही दुसरे अकाउंट उघडावे व त्यातून तुमची इन्शुरन्सचे हफ्ते किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल तर त्याचे हप्ते यासोबत इतर आरडी सारखे हप्ते देखील तुम्ही या दुसऱ्या अकाउंट मधून डेबिट होतील याची सोय करणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये जे पैसे शिल्लक राहतील त्यातूनच तुम्हाला खर्च भागवायचे आहेत हे लक्ष्य तुम्ही सेट करणे गरजेचे आहे व त्यानुसार नियोजन ठेवावे.

4- तुमचा बजेटची कुटुंबाला माहिती देणे गरजेचे– तसेच आपल्या घरातील जे काही सदस्य असतात ते देखील काही वस्तू विकत घेत असतात किंवा आपल्याकडे ती मागत असतात. त्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांना तुमचा महिन्याचा आर्थिक बजेट परफेक्ट माहीत असणे गरजेचे आहे.

म्हणजे यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे मिळतात व त्यातून किती पैसे खर्च तुम्ही करू शकतात? ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांना विश्वासात घेऊन सांगणे गरजेचे आहे. म्हणजे तुमच्यावर जो काही घरातील काही वस्तू किंवा सदस्यांच्या मागणीसाठी खर्च करण्याचा मानसिक ताण असेल तो कमी होईल.

5- ईएमआयवर कोणत्या वस्तू विकत घ्याव्यात?- आजकाल आपण पाहतो की बऱ्याच गोष्टी तुम्हाला सुलभ हप्त्यांवर मिळत असल्याने आपण खरेदी करत सुटतो.परंतु हे खरच योग्य आहे का हे देखील पाहणे गरजेचे आहे. आजकाल क्रेडिट कार्ड किंवा ई-कॉमर्स साइटवर अनेक ईएमआय सवलती मिळतात.

यामुळे आपण घरातील उपकरणे दर ठराविक वर्षांनी बदलत असतो व अशी सवय बऱ्याच कुटुंबांमध्ये दिसून येते. परंतु असे करताना तुमच्या घरातील ज्या काही जुन्या वस्तू आहेत त्या खरच बदलणे गरजेचे आहे का? त्या वस्तू नेमक्या खराब झाल्या आहेत म्हणून बदलायचे आहेत का? त्याचा विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे राहील.

6-शॉपिंग ॲपपासून सावध राहावे– आता अनेक शॉपिंग ॲप आले असून आपल्या मोबाईल मध्ये असे ई-कॉमर्स एप्लीकेशन असतात व आपण बऱ्याचदा रिकाम्या वेळेमध्ये सदर अँप मध्ये कुठला ऑफर सुरू आहेत का हे बघत असतो. बऱ्याचदा असे करत असताना एखादा प्रॉडक्ट आपल्याला एखाद्या मोठ्या डिस्काउंट किंवा एखाद्या आकर्षक ऑफर मध्ये दिसले तर आपण ते खरेदी करत असतो.

ही सवय टाळण्याकरिता कमीत कमी सहा महिने तुमच्या घरातल्या ज्या काही रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत त्या वगळता दुसरी कुठलीही अनावश्यक वस्तू ऑनलाईन विकत घेणार नाही असा निश्चय करणे तुम्ही खूप गरजेचे आहे.

Categories आर्थिक Tags invetsment tips, Money, Money Saving, Money Saving Tips, Saving Account
Ahmednagar News : मेथी ५० पैसे, कोथांबीर १ रुपया ! भाव नसल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकत प्रजासत्ताकदिनीच शेतकऱ्याचा आक्रोश
Investment Tips: फक्त 150 रुपयांची बचत तुम्हाला मिळवून देईल 22 लाखापेक्षा जास्त पैसे! पण कशी? वाचा माहिती
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress