Multibagger Stock : स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर बाजार हे जोखमीचे असले तरी देखील इथला परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे, म्हणूनच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे.
असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन श्रीमंत केले आहे. आज आपण अशाच एका स्टॉक बद्दल बोलणार आहोत ज्याने दीर्घकालीन गुंतवणुकीतून आपल्या ग्राहकांना मालामाल केले आहे. आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत तो म्हणजे, मद्य उत्पादक कंपनीचा पिकाडली अॅग्रो इंड्स लिमिटेड. अवघ्या 25 पैशांच्या या शेअरने तुफानी वेगाने धावून गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 1997 पासून आत्तापर्यंत या शेअरने 112,700.00% परतावा दिला आहे.
Piccadily Agro Inds Limited च्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले आहे, त्यांनी या ऑक्टोबरमध्ये 2023 च्या व्हिस्की ऑफ वर्ल्ड अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट इन शो, डबल गोल्ड’ हा किताबही जिंकला आहे. या भारतीय ब्रँडला मोठी मागणी आहे. जेव्हा कंपनीने हा पुरस्कार जिंकला तेव्हा शेअर 1997 मध्ये 25 पैशांवरून वाढून 165 रुपये झाला होता. म्हणजेच 11 जुलै 1997 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये कोणत्याही गुंतवणूकदाराने 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते ठेवले असते, तर ऑक्टोबर 2023 च्या सुरूवातीस त्याची संपत्ती 65 कोटी रुपयांपर्यंत वाढली असती. 3 ऑक्टोबर रोजी, स्टॉकमध्ये 20 टक्के वाढ नोंदवली गेली, तर हा कल 4 ऑक्टोबरलाही कायम राहिला.
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्सनी दिलेला परतावा आणखी वाढला आहे. Piccadily Agro Inds चा शेअर आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी 282 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. त्यानुसार पाहिल्यास, 11 जुलै 1997 ते 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत या शेअरमधून परतावा 1,12,700% झाला आहे. हे स्पष्ट आहे की, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना महिन्यामागून महिना आणि वर्षानुवर्षे श्रीमंत केले आहे.
Piccadily Agro Inds स्टॉकची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी पाहिली, तर त्याच्या गतीचा सहज अंदाज लावता येईल. 26 ऑक्टोबर 2018 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 12.03 रुपये होती, म्हणजेच या पाच वर्षांत शेअरची किंमत 2,244.14% वाढली आहे. गेल्या एका वर्षात, या शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा 439.20% आहे, जर आपण गेल्या 6 महिन्यांबद्दल बोललो तर त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 475.28% इतका जबरदस्त परतावा दिला आहे. गुरुवारी त्यात घसरण झाली असली तरी, या शेअरने गेल्या एका महिन्यात १७३.६५% परतावा दिला आहे.
भारतातच नाही तर परदेशातही मागणी
पिकाडिली अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या इंद्री व्हिस्कीला भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड मागणी आहे. सध्या, भारतातील 19 राज्यांमध्ये त्याचा पुरवठा आणि विक्री केली जाते, तर हा ब्रँड जगातील 17 देशांमध्ये उपलब्ध आहे. या व्हिस्कीचे वैशिष्टय़ म्हणजे ही व्हिस्की केवळ दोनच वर्षे सुरू झाली आहे. पिकाडिली डिस्टिलरीजचा हा व्हिस्की ब्रँड 2021 मध्ये पहिल्यांदा हरियाणामध्ये लाँच करण्यात आला. या कंपनीचा प्लांट फक्त हरियाणात आहे.