Multibagger Stocks 2023 : एका महिन्यातच “या” स्टॉकने दिला 10 वर्षांच्या एफडीपेक्षा जास्त परतावा !

Sonali Shelar
Published:
Multibagger Stocks 2023

Multibagger Stocks 2023 : FD मधील गुंतवणूक अजूनही अनेकांची पहिली पसंत आहे. या गुंतवणुकीत परतावा जरी कमी असला तरीदेखील येथिक गुंतवणूक सुरक्षित असते. म्हणूनच गुंतवणूकदार येथे पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने फक्त एका महिन्याचाच 10 वर्षांच्या एफडी रिटर्नपेक्षा जास्त परतावा दिला आहे.

आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे प्रीमियर एक्स्प्लोसिव्हज लिमिटेड या स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर. कंपनीबद्दल बोलायचे झाले तर ही कंपनी खूपच मोठी आणि प्रसिद्ध आहे. प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह ISRO कडून खाण कंपन्यांना स्फोटकांचा पुरवठा करते. या कंपनीने इस्रोच्या विविध मोहिमांमध्येही भूमिका बजावली आहे.

सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 1,100 कोटी रुपयांपेक्षा थोडे जास्त आहे. आज गुरुवारी बाजार घसरला असताना त्यांचा शेअर मजबूत झाला आहे. आज तो 1.28 टक्क्यांच्या वाढीसह 1,002.50 रुपयांवर बंद झाला. आजच्या व्यवहारात तो 1,039.50 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

फक्त 1 महिन्यातच घेतली झेप

गेल्या 5 दिवसांत या शेअरची किंमत सुमारे 6 टक्क्यांनी वाढली आहे, तर एका महिन्यात या शेअरची किंमत 132 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. 4 जुलै रोजी त्याच्या एका शेअरची किंमत फक्त 431 रुपये होती, जी आता 1000 रुपयांच्या पुढे गेली आहे. म्हणजे अवघ्या 1 महिन्यात या शेअरची किंमत दुपटीने वाढली आहे.

जर तुम्ही याची तुलना बँक एफडीशी केली तर बँका सध्या एफडीवर सरासरी वार्षिक 7 टक्के दराने व्याज देत आहेत. बँक एफडी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी लागणारा वेळ काढायचा झाला, तर 72 ला व्याजदराने भागावे लागेल. अशा प्रकारे आपल्याला 10.2 वर्षांचा आकडा मिळेल. याचा अर्थ असा की बँक एफडी तुम्हाला 10 वर्षांतही परतावा देऊ शकणार नाहीत, जे प्रीमियर एक्सप्लोझिव्ह शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना केवळ एका महिन्यात दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe