PF Transfer Method: साधी पद्धत वापरा आणि तुमच्या पहिल्या कंपनीतील पीएफ नव्या कंपनीत ट्रान्सफर करा! वाचा पद्धत

Ajay Patil
Published:
epfo rule

PF Transfer Method:- आपण खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असो किंवा सरकारी नोकरीमध्ये असो यामध्ये आपला प्रत्येक महिन्याला पगारातून पीएफपोटी काही रक्कम कापली जाते व तितकीच रक्कम ही नियोक्ता कंपनीकडून आपल्या पीएफ खात्यात प्रत्येक महिन्याला जमा केली जाते.

या सगळ्या पीएफ खात्यांचे नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ च्या माध्यमातून केले जाते. या ईपीएफओ अंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याच्या संदर्भात अनेक नियम असून ते बरेच जणांना माहीत नसतात. आपण जर आत्ताच्या तरुणांचा विचार केला तर ज्या ठिकाणी चांगली पगार मिळते त्या ठिकाणी जाण्यासाठी आजकालचे तरुण धडपडत असतात.

चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर पहिली कंपनी किंवा पहिल्या ठिकाणची नोकरी लागलीच सोडली जाते. म्हणजेच नोकरी बदलण्याचा जो काही कल आहे तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला सध्या दिसून येतो. परंतु यामध्ये जर आपण पीएफचा विचार केला तर अगोदरची कंपनी सोडून जर नव्या कंपनीत गेले तर तुमच्या जुन्या कंपनीचा सुरू असलेला पीएफ हा नवीन कंपनीत ट्रान्सफर करणे गरजेचे असते.

परंतु तो कसा ट्रान्सफर करावा याची माहिती बऱ्याच जणांना नाही. यामध्ये  तुमच्या इतर काही पीएफ अकाउंट मध्ये पैसे असतात व ते तुम्हाला एकाच अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणे खूप गरजेचे असते. परंतु अशा पद्धतीने एकाच अकाउंटमध्ये पीएफचे पैसे कसे ट्रान्सफर करावे याची पद्धत बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे गोंधळ उडतो. त्यामुळे या लेखात आपण आपल्या इतर पीएफ अकाउंट मधून पीएफचे पैसे एकाच अकाउंट मध्ये ईपीएफओच्या माध्यमातून कसे ट्रान्सफर करावे? याबद्दलची माहिती बघू.

ही पद्धत वापरा आणि घरबसल्या पीएफ ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करा

1- याकरता तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओच्या  संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.

2- त्यानंतर तुमचा युएएन नंबर आणि पासवर्ड टाकून कॅपच्या कोड टाकावा व साइन इन करावे.

3- साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होते व त्यावर ऑनलाईन सर्व्हिस असे लिहिलेले असते. या ऑनलाईन सर्विस पर्यायावर क्लिक करा.

4- यामधील वन मेंबर वन ईपीएफ अकाउंट( ट्रान्सफर रिक्वेस्ट) लिंक वर क्लिक करावे.

5- नंतर परत तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते व त्यामध्ये तुमचे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल व ती तुम्ही व्यवस्थित वाचून तपासून घ्यावी.

6- त्यानंतर त्या ठिकाणी पीएफ अकाउंट नंबर सिलेक्ट करावा. ज्यातील रक्कम तुम्हाला दुसऱ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचे असेल तो अकाउंट नंबर सिलेक्ट करणे गरजेचे आहे.

7- त्यानंतर गेट ओटीपी बटनावर क्लिक करावे. हा ओटीपी तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर पाठवण्यात येतो व हा ओटीपी इंटर करून सबमिट करावे.

8- ओटीपी टाकल्यावर तुमच्या कंपनीला ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेस रिक्वेस्ट जाते.

9- त्यानंतर तीन दिवसांनी संपूर्ण प्रोसेस पूर्ण होते. सर्वप्रथम कंपनी हे पैसे ट्रान्सफर करते व त्यानंतर ईपीएफओचा फिल्ड ऑफिसर त्याची तपासणी करेल.

10- त्यानंतर तुम्हाला जुनी आणि नव्या नोकरीच्या माहितीसह फार्म 13 भरायचा असतो. हा फॉर्म भरून तुम्ही पीडीएफ फॉरमॅटमध्ये प्रिंट काढावी व त्यावर सही करावी.

11- मग हा फॉर्म त्या कंपनीकडे जमा करावा ज्या ठिकाणच्या पीएफ अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत.

12- त्यानंतर संबंधित कंपनी किंवा संस्था तुमची ईपीएफ ट्रान्सफर रिक्वेस्टला डिजिटली अप्रूव्ह करते. त्यानंतर पीएफचे पैसे तुम्ही नवीन कंपनीत काम करत असलेल्या कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या पीएफ अकाउंट मध्ये ट्रान्सफर होतील.

13- अशा पद्धतीने तुमची रिक्वेस्ट पूर्ण झाली आहे किंवा नाही याचे स्टेटस तुम्हाला ट्रॅक क्लेम स्टेटस मध्ये दिसून येते.

अशा पद्धतीने तुम्ही इतर पीएफ अकाउंट मधील पैसे एकाच अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe