Home Loan Tips: होमलोनची मुदतपूर्व परतफेड करावी का मिळालेले अतिरिक्त उत्पन्न इतर ठिकाणी गुंतवावे? वाचा काय राहील फायद्याचे?

Ajay Patil
Published:
home loan pre payment

Home Loan Tips:- प्रत्येकाला इच्छा असते की स्वतःचे घर असावे व स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरता बरेच जण होमलोनचा म्हणजेच गृहकर्जाचा आधार घेतात. आपल्याला माहिती आहे की गृह कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा खूप मोठा असतो.

यामध्ये बरेच व्यक्ती गृह कर्जाचे प्री पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच तुमचा जो काही महिन्याला गृह कर्जाचा ईएमआय असतो त्या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला काही अतिरिक्त रक्कम संबंधित कर्जदात्याकडून जमा केली जाते व त्यालाच आपण प्री पेमेंट म्हणत असतो.

अशा पद्धतीने प्री पेमेंट करणे तेव्हा शक्य होते जेव्हा काहीतरी अतिरिक्त उत्पन्न संबंधित व्यक्तीला प्राप्त होत असते. परंतु यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अशा पद्धतीच्या अतिरिक्त उत्पन्न जर मिळायला लागले तर होम लोनचे प्री पेमेंट किंवा मुदतपूर्व परतफेड करावी की ते उत्पन्न म्युच्युअल फंडात गुंतवून अधिक व्याज मिळवावे? यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात बघू.

 होमलोनची मुदतपूर्व परतफेड करावी का?

1- होम लोनचे प्री पेमेंटचे फायदे नेमके काय आहेत?- जेव्हा आपण होम लोनचा जो काही ईएमआय असतो त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला काही रक्कम जेव्हा जमा करतो तेव्हा त्याला प्री पेमेंट असे म्हटले जाते.

जेव्हा आपण ईएमआय व्यतिरिक्त असे पेमेंटची रक्कम जमा करतो तेव्हा ती रक्कम तुमच्या मुख्य शिल्लक मधून वजा केली जाते व यामुळे तुमचे गृह कर्जाची मूळ रक्कम कमी व्हायला मदत होते व व्याज देखील वाचते.

यामध्ये तुम्ही तुमच्या ईएमआयची रक्कम देखील कमी करू शकता व तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारू शकतात. यामध्ये तुम्ही  गृह कर्जाची मुदतपूर्व परतफेड केल्यास ईएमआयची रक्कम एसआयपी स्वरूपामध्ये गुंतवली जाऊ शकते.

2- या गोष्टींवर लक्ष ठेवावे- तुम्ही जेव्हा प्री पेमेंट करता त्यावर कर्ज पुरवठादार म्हणजेच बँक किंवा इतर वित्तीय संस्था कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारते की नाही याची खात्री करावी. जर तुमच्याकडे वैयक्तिक कर्ज किंवा कार कर्ज असल्यास होमलोन घेण्यापूर्वी ते बंद करणे गरजेचे आहे.

कारण यामध्ये जास्त व्याज जात आहे. गृह कर्जाची जर तुम्ही लवकर परतफेड केली तर त्यामुळे गृहकर्जावरील व्याज आणि आयकर रिटर्नमधील मूळ रकमेवर सूट मिळू शकणार नाही. कधीही तुमचा आपत्कालीन निधी तुम्ही जमा केला असेल

तर तो गृह कर्जाच्या प्री पेमेंटसाठी वापरू नका. समजा कर्जाच्या अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही प्री पेमेंट केले तर तुम्हाला खूप जास्त फायदा मिळू शकतो.

परंतु तुमच्या गृह कर्जाला जास्त कालावधी उलटून गेल्यावर तुम्ही यामध्ये प्री पेमेंट केले तर तुम्हाला कुठल्याही फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही प्री पेमेंट करण्याऐवजी ती अतिरिक्त रक्कम इतरत्र चांगल्या ठिकाणी गुंतवणे फायद्याचे ठरेल.

3- म्युच्युअल फंडात करा गुंतवणूक समजा तुम्ही गृह कर्जाचे प्री पेमेंट करण्याऐवजी जर ती रक्कम एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडासारख्या ठिकाणी गुंतवली तर तुम्ही गृह कर्जाच्या कालावधीत परतफेड केलेल्या रकमेपेक्षा अधिकच्या पैशांची बचत करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe