SBI Mudra Yojana:- केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता ज्या काही योजना चालवल्या जातात त्या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केला जातो. तसेच बऱ्याच व्यक्तींना व्यवसाय उभारायचा असतो किंवा अस्तित्वात असलेला व्यवसायामध्ये वाढ करायची असते.
अशा घटकांना देखील विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते. यामध्ये जर आपण केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा विचार केला तर ही योजना देखील व्यवसाय स्थापन करणे किंवा व्यवसाय वाढवणे याकरिता खूप फायद्याची अशी योजना आहे.
पंतप्रधान मुद्रा योजनेच्या अंतर्गत विविध बँकेतून आपल्याला कर्ज दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत व्यापाऱ्यांना बँकेकडून व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळते.असे बरेच व्यक्ती असतात की त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतात किंवा आहेत ते पैसे कमी पडतात.
अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत बँकेकडून कर्ज मिळू शकते. देशामध्ये छोट्या मोठ्या उद्योगांना चालना मिळावी याकरिता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ एप्रिल 2015 रोजी वीस हजार कोटी रुपये भांडवल असलेल्या मुद्रा बँकेचे उद्घाटन केले.
काय आहे एसबीआय मुद्रा लोन?
तर आपण देशातील सर्वात महत्त्वाची व मोठ्या बँकेचा विचार केला तर ती स्टेट बँक ऑफ इंडिया असून या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत 50 हजार रुपये पर्यंत व्यवसायासाठी कर्ज मिळते. याकरिता एक ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे असते व हा अर्ज केल्यानंतर योजनेच्या नियम व अटींची तुम्ही पूर्तता करत असाल तर तुमच्या बँक खात्यात काही दिवसात कर्जाचे पैसे जमा केले जातात.
मुद्रा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचे प्रकार
1- शिशुश्रेणी– या श्रेणी अंतर्गत 50000 पर्यंत कर्ज मिळते व याचा व्याजदर 9 ते 12 टक्क्यांपर्यंत आकारला जातो व कर्जाचा कालावधी पाच वर्षांकरिता असतो.
2- किशोर श्रेणी– या प्रकारच्या श्रेणी अंतर्गत 50 हजार ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळते. यामध्ये व्याजाचा दर हा बँकेचे जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानुसार आकारला जातो व कर्जाचा कालावधी कर्जदाराच्या प्रतिष्ठेवर किंवा नावलौकिकतेवर अवलंबून असतो.
3- तरुण श्रेणी– या प्रकारच्या श्रेणीच्या माध्यमातून पाच ते दहा लाखापर्यंत कर्ज मिळते. या प्रकाराच्या श्रेणीमध्ये मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार असतो.
एसबीआय मुद्रा लोन कुणाला मिळू शकते?
या योजनेच्या माध्यमातून छोट्या व्यवसायिकांना तसेच दुकानदारांना कर्ज मिळते. त्यामध्ये ज्यांचा नवीन व्यवसाय आहे किंवा ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना देखील कर्ज मिळते. तसेच चहावाला, फळ व भाजी विक्रेता,
फेरीवाला आणि सलून वाला यासारख्या लघु उद्योगांना सुद्धा या माध्यमातून कर्ज मिळते. एवढेच नाही तर ट्रक व टॅक्सीवर व्यवसाय करणारे व वस्तू दुरुस्ती करून देणारी दुकाने, गृहउद्योग तसेच लघुउद्योग यांना सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज मिळते.
एसबीआय मुद्रा लोन योजनेचे वैशिष्ट्ये
1- या प्रकारचे कर्ज तुम्हाला कुठल्याही तारणाशिवाय मिळते.
2- या योजनेच्या अंतर्गत स्वतःच्या दहा टक्के भांडवलाची आवश्यकता राहत नाही.
3- योजनाचा लाभ तुम्हाला सरकारी बँकेतच मिळतो.
4- तसेच या योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही कुठल्याही बँकेचा थकबाकीदार नसावे.
5- तसेच ज्या लाभार्थ्याला या योजनेसाठी कर्ज घ्यायचे आहे त्या लाभार्थ्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
मुद्रा कर्ज योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराकडे ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा म्हणून विज बिल तसेच घर खरेदीपावती, व्यवसायासाठी आवश्यक वस्तूंचे कोटेशन व बिले, ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे त्या ठिकाणचा परवाना आणि स्थानिक पत्ता व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही व्यवसायाकरिता ज्या व्यापाऱ्याकडून माल घेणार आहात त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता असणे आवश्यक आहे.
या योजनेत संबंधित तुमचे काही तक्रार असेल तर या ठिकाणी करू शकता संपर्क
महाराष्ट्रासाठी
टोल फ्री क्रमांक–1800-102-2626
देशांतर्गत तक्रारी करिता टोल फ्री नंबर
1800-180-1111 आणि 1800-11-0001