पोस्ट ऑफीस किंवा राष्ट्रीयीकृत बँकामध्ये ठेवलेला पैसा हा सुरक्षित समजला जातो. सध्या सगळीकडे आकर्षक व्याजदर दिले जातात. सामान्य गुंतवणूकदार बँका आणि पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. परंतु या दोन्ही चांगला पर्याय कोणता? हा प्रश्न कायम पडतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफीस व एसबीआय या दोन्हींमध्ये कोणती एफडीला जास्त परतावा मिळतो, ते सांगणार आहोत.
एफडीवर रिटर्न किती?
हे गणित समजून घ्यायचे असेल तर 5 वर्षांच्या एफडीचा तुलनात्मक आभ्यास करावा लागेल. तुम्हाला 5 वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया 6.5 टक्के रिटर्न देईल. हीच गुंतवणूक पोस्ट ऑफिसमध्ये केली तर पोस्ट ऑफीस या कालावधीसाठी 7.5 टक्के रिटर्न देते. स्टेट बँक ऑफ इंडिया एफडीवर 3.50 टक्के ते 7.25 टक्के व्याज देते. तर पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींवर ग्राहकांना 6.9 टक्के ते 7.5 टक्के व्याज दिले जाते.

SBI चे 5 वर्षांच्या एफडीचे व्याजर
गुंतवलेली रक्कम: ₹3,50,000
व्याजदर: वार्षिक 6.50%
अंदाजे रिटर्न: 1,33,147
मॅच्युरिटीवर एकूण मूल्य: 4,83,147
पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या एफडीचे रिटर्न
गुंतवलेली रक्कम: 3,50,000
व्याजदर: वार्षिक 7.50%
अंदाजे परतावा: 1,57,482
मॅच्युरिटीवर एकूण मूल्य: 5,07,482
पोस्ट ऑफिस मिळतो फायदा
तुम्ही SBI मध्ये 5 वर्षांसाठी 3.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 6.5 टक्के दराने 1,33,147 रुपये व्याज मिळेल. तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 4,83,147 रुपये मिळतील. जर तुम्ही पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटमध्ये 5 वर्षांसाठी 3.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 7.5 टक्के दराने 1,57,482 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 5,07,482 रुपये मिळतील.