सरकारी योजनेतून ‘या’ महिलांना मिळतील प्रतिमाह 1500 रुपये! वाचा योजनेची ए टू झेड माहिती

Published on -

Scheme For Women:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. तसेच विविध क्षेत्रांकरिता देखील अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जातात. जर आपण काही सामाजिक घटकांचा विचार केला तर यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी तसेच लहान बालके व महिलांकरिता देखील अनेक योजना राबवून या घटकांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

याबाबतीत जर आपण महाराष्ट्र राज्य सरकारचा विचार केला तर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून देखील  समाजातील विधवा महिला व अत्याचारीत महिला तसेच निराधार महिलांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात.

या सगळ्या योजनांमधून जर आपण महिलांसाठी राबवल्या जात असणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा विचार केला तर महिलांसाठी असलेली खूप मोठी फायद्याची योजना असून निराधार महिलांना या माध्यमातून आर्थिक आधार मिळण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची अशी योजना आहे.

 संजय गांधी निराधार योजना आहे महिलांसाठी महत्त्वाची

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करण्याचा उद्देश ठेवण्यात आला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील सेतू कार्यालयाशी संपर्क साधने गरजेचे आहे. तसेच तुम्ही याकरिता घर बसून देखील अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात.

या योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी पाहिले तर प्रामुख्याने दिव्यांग, दुर्धर आजार ग्रस्त, विधवा, देवदासी, अनाथ, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला तसेच तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाची पत्नी त्यासोबतच पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी घटकांना या माध्यमातून लाभ दिला जातो.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

1- याकरिता या योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज

2- तसेच 18 ते 65 वर्ष पर्यंतचा वयाचा दाखला( अर्जदाराचे वय जर 18 पेक्षा कमी असेल तर पालकांमार्फत लाभ )

3- अर्जदार हा कमीत कमी पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे

4-एखादी विधवा महिला जर अर्ज करत असेल तर त्यांच्या करिता पतीचा मृत्यूचा दाखला

5- दिव्यांग महिला अर्ज करत असेल तर जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगाचा दाखला( कमीत कमी 40 टक्क्यांचा )

6- अनाथाचा दाखला

7- एखादा दुर्धर आजार असेल तर त्या संबंधीचे प्रमाणपत्र

8- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला

9- दिव्यांगांकरिता जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्न मर्यादा ही पन्नास हजाराची आहे.

10- तसेच अर्जदाराचे आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स तसेच रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो

 या योजनेच्या माध्यमातून किती मिळते आर्थिक मदत?

संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलेला अर्ज मंजूर झाल्यावर प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो.

 यासाठीचा अर्ज कुठे करावा?

या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयांमध्ये असलेल्या सेतू केंद्राला भेट देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर  https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर क्लिक करून अर्ज करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe