Fixed Deposit : FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे, काही बँकांनी आपल्या FD व्यजदरात वाढ करून आपल्या ग्राहकांना खुश केले आहे. अशातच नुकतेच इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. या स्मॉल फायनान्स बँकेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 9 टक्क्यांपर्यंतचा लाभ मिळत आहे.
बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन FD व्याजदर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू होतील. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य लोकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना FD वर किती व्याज देते? जाणून घेऊया…
बँक 7 ते 29 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर 3.5% व्याज देते. तसेच 30 ते 45 दिवसांच्या दरम्यानच्या FD वर 4 टक्के व्याजदर देते. तुम्हाला 46 ते 90 दिवसांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वर 4.5 टक्के व्याजदर मिळेल. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 91 ते 180 दिवसांच्या कालावधीतील FD वर 5.25 टक्के व्याजदर देते. त्याच वेळी, एका वर्षात मुदत ठेवींवर 8.2 टक्के व्याजदर असेल.
एक वर्ष आणि एका दिवसात परिपक्व होणाऱ्या एफडीवर, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 8 टक्के व्याजदर देते. 367 ते 443 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी, बँक 8.2 टक्के व्याजदर देते. तुम्हाला 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 8.5 टक्के व्याजदर मिळेल. बँक 445 दिवस ते 18 महिने मुदतीच्या ठेवींसाठी 8.2 टक्के व्याज दर देते. बँक 18 महिने आणि एक दिवस ते दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.75 टक्के व्याज लाभ देत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक जेष्ठ नागरिकांना दोन वर्षे ते एक दिवस आणि 887 दिवसांच्या मुदतीच्या मुदत ठेवींसाठी 8 टक्के व्याज दर देत आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर जास्त व्याजाचा लाभ मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक लाभ मिळणार आहे. जेष्ठ नागरिकांना 444 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 9 टक्के व्याजदर दिला जात आहेत.