गॅस बुकिंग आणि नवीन कनेक्शन बुकिंगसाठी सरकारने केलेय ‘असे’ काही ; होणार सुलभ काम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- इंडेन गॅस ग्राहक आता फक्त एका मिस कॉलद्वारे गॅस रिफिल सिलिंडर बुक करू शकतात. ही सुविधा देशातील सर्व इंडेन गॅस ग्राहकांना उपलब्ध आहे.

यासाठी सरकारने 8454955555 हा नवीन क्रमांक जारी केला आहे. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये ही सेवा सुरू केली.

कोणताच चार्ज लागणार नाही :- सिलिंडर्स बुक करतांना ग्राहकांना या सुविधेसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की मिस्ड कॉलची सुविधा ग्राहकांना प्रतीक्षा करण्यापासून मुक्त करेल आणि सिलिंडर जलद बुक होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार या सेवेचा ग्रामीण ग्राहकांना फायदा होणार आहे जे फोन कॉलद्वारे सिलिंडर बुक करू शकत नाहीत.

नवीन कनेक्शनचे बुकिंग देखील शक्य होईल :- केंद्रीय मंत्री म्हणाले की, आता इंडेनच्या नवीन कनेक्शनचे बुकिंग मिस कॉलद्वारे करता येईल. त्याची सुरुवात भुवनेश्वर येथून करण्यात आली आहे. लवकरच ही सुविधा देशभरात राबविली जाईल. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया व्हिजनअंतर्गत ग्राहकांवर लक्ष केंद्रित करुन एलपीजी रिफिल बुकिंगची सुविधा आणि नवीन कनेक्शन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या सुविधेद्वारे ग्राहकांना मोफत सेवा मिळणार आहे.

ऑक्टेन -100 प्रीमियम पेट्रोलचा दुसरा फेस रोलआउट :- याव्यतिरिक्त, केंद्रीय मंत्र्यांनी इंडेनचा जागतिक दर्जाचा प्रीमियम ग्रेड पेट्रोल (ऑक्टेन -100)चा सेकंड फेस आणला आहे. इंडियन ऑईल कडून हे पेट्रोल (एक्सपी 100) हाय-एंड कारसाठी उपलब्ध करुन देत आहे. दुसर्‍या टप्प्यात हे पेट्रोल चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता, कोची, इंदूर आणि भुवनेश्वरमध्ये उपलब्ध असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment