FD Rates : चांगल्या आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. तसेच देशातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूकीचा प्रकार म्हणजे एफडी. कारण येथील गुंतवणूक सुरक्षित असतात. एफडीवर प्रत्येक बँक वेगवेगळे व्याजदर ऑफर करते, त्यावर मिळणारा परतावाही वेगळा असतो. अशातच काही एफडी अशा आहेत ज्या उच्च परतावा देतात.
तुम्हीही अशाच एफडी मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला सर्वोत्तम पर्याय सांगणार आहोत. तुम्ही कमी परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमी परतावा मिळेल. पण अशा काही बँका आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला एफडीवर जास्त परतावा मिळेल.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
ही बँक सामान्य लोकांना 9% आणि ज्येष्ठ नागरिकांना 999 दिवसांच्या FD वर 9.60% व्याज देत आहे. सूर्योदय फायनान्स ग्राहकांना जास्तीत जास्त 9.60 टक्के व्याज देत आहे. बँकेचे व्याजदर 4.50 टक्क्यांपासून ते 9.60 टक्क्यांपर्यंत आहेत. येथे मिळणारे व्याज हे बाकीच्या बँकांपेक्षा जास्त आहेत, जर तुम्हाला एफडीवर चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही येथे गुंतवणूक करू शकता.
जन स्मॉल फायनान्स बँक
ही बँक सामान्य लोकांना 8.50 टक्के व्याज देत आहे आणि दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याज देत आहे. बँक सामान्य ग्राहकांना 4.25 टक्के ते 9 टक्के पर्यंत व्याज ऑफर करते.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
ही बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 9.00% आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.50% व्याज देत आहे. याशिवाय, बँक 181-201 दिवसांच्या एफडीवर 9.25 टक्के व्याज देत आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
बँक 888 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याज देत आहे. हे नवे दर 11 एप्रिलपासून लागू झाले आहेत. या बँकेत देखील तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा कमावू शकता.
ESAF स्मॉल फायनान्स बँक
बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 9% व्याज देत आहे. हे व्याज ज्येष्ठ नागरिकांना दिले जात आहे. सर्वसामान्यांना 8.50 टक्के व्याज दिले जात आहे.